vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा गावामध्ये दौऱ्याची होतेय सर्वत्र चर्चा..

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा गावामध्ये दौऱ्याची होतेय सर्वत्र चर्चा..

 

राज्य प्रतिनिधी

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार श्री. रमेशआप्पा कराड साहेबांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते श्री. ऋषिकेशदादा कराड यांनी रेणापूर तालुक्यातील खरोळा गावामध्ये प्रचार दौरा आयोजित केला होता.

त्यावेळी प्रथमतः खरोळा गावातील श्रीराम तांडा येथे प्रचार बैठकी दरम्यान पुरुष तसेच महिला भगिनींनी आदरणीय रमेशअप्पांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांची आठवण करून देत, येणाऱ्या काळात आम्हाला रमेशअप्पाच हवे आहेत… असा जयजयकार करत येणाऱ्या निवडणुकीसाठी त्यांना विजयपूर्ण आशीर्वाद दिला. यावेळी श्री. ऋषिकेश दादांनी त्यांना पुढील काळात तांड्यातील महत्वपूर्ण विकास काम करण्याचे व मूलभूत सुविधा पुरविण्याचे आश्वासनही दिले.

श्रीराम तांडा येथील बैठक संपल्यानंतर असंख्य नागरिकांच्या गर्दीत ऋषी दादांनी माळे गल्ली येथे आपली प्रचार बैठक आयोजित केली, त्यावेळी भाजपा महायुतीने सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती देऊन ऋषिकेशदादा यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात निवडून गेलेल्या काँग्रेस आमदारांनी काय काम केले कुठल्या विकासाला निधी आणला असा प्रश्न उपस्थित करून भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी अवघ्या साडेतीन-चार वर्षात गावागावात वाडी-वस्तीत विविध विकासाच्या योजना राबवल्या असल्याची माहिती दिली. याप्रसंगी श्री. नवनाथजी भोसले, श्री. अमर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

कालच्या बैठकीमध्ये जमलेली गर्दी पाहता, आदरणीय रमेशअप्पा यांनी कमवलेल्या जनतेचे दर्शन घडून आले होते.त्यांच्याच विकसनशील पाउलावर पाऊल ठेवत एक युवा नेतृत्व असलेले ऋषीदादा यांनी रमेशअप्पांनी मोठ्या प्रयत्नांतून केलेल्या कामांना उजाळा देत, आगामी निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळण्यासाठी मायबाप जनतेचे आशीर्वाद घेतले. असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

पहिल्या स्मार्ट इंटेलिजंट सातनवरी या गावातील डिजिटल उपक्रमामध्ये ग्रामस्थानांचा सहभाग आवश्यक – विजयलक्ष्मी बिदरी

राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा उपक्रम-प्रवाश्यांच्या समस्या व निराकरणासाठी प्रत्येक बुधवारी “प्रवासी राजा दिन” व “कामगार पालक दिन”

मराठवाडा शिक्षक संघाचे उपोषण व धरणे आंदोलन

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांची माहिती-जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघातएकुण 16 लाख 52 हजार 511 मतदार

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांसाठी महाविस्तार एआय अप शेतकऱ्यांचा डिजिटल मित्र..

vishwatmaklokswamivarta

रांजणगावला घोड धरणावरून नवीन पाणी पुरवठा योजना सुरु करण्यासाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्यात यावा-उपमुख्यमंत्री अजित पवार