vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

विकासही होणार आणि व्यवस्थापनही होणार!मुखेड, नांदेडमध्ये कमळ फुलणार! महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकासही होणार आणि व्यवस्थापनही होणार!मुखेड, नांदेडमध्ये कमळ फुलणार! महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्य प्रतिनिधी नांदेड

मुखेड भाजपा उमेदवार डॉ. तुषार राठोड आणि नांदेड लोकसभा (पोटनिवडणूक) भाजपा उमेदवार डॉ. संतुकराव हंबर्डे यांच्या प्रचारार्थ मुखेड, नांदेड येथे भाजपा जाहीर सभेत उपस्थित होतो. यावेळी विराट संख्येने उपस्थित जनसमुदायाला संबोधित केले.

विधानसभा गाजवणारे आमदार म्हणून डॉ. तुषार राठोड यांच्याकडे पाहिले जाते तर डॉ. संतुकराव हंबर्डे व्यवस्थापनाचे डॉक्टर आहेत. एकीकडे मेडिकल डॉक्टर तर दुसरीकडे व्यवस्थापनाचे डॉक्टर आपण उमेदवार म्हणून दिलेले आहेत, त्यामुळे आता या भागामध्ये विकास व व्यवस्थापन दोन्हीही होणार आहे. लेंडी धरण प्रकल्पासाठी डॉ. तुषार राठोड यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यासाठी त्यांचे आभार मानतो, लेंडी धरण बाधित शेतकऱ्यांसाठी ₹165 कोटींचे पॅकेज आपल्या महायुती सरकारने दिले आहे.

जम्मू-काश्मिरमध्ये भारताचे संविधान लागू करुन संविधान रक्षण करण्याचे काम मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. जम्मू काश्मीरच्या इतिहासात पहिल्यांदाच तेथील मुख्यमंत्र्याने संविधान हातात घेऊन मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन आरक्षणाबद्दल खोटी माहिती पसरवत आहेत मात्र यावेळी त्यांचे फेक नॅरेटीव्ह चालणार नाही.

आपल्या सरकारने शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, भावांतर योजनेसह अनेक कल्याणकारी योजना राबवल्या आहेत. तसेच माझी लाडकी बहीण, एसटी प्रवासात सवलत, मोफत शिक्षण अशा योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आपल्या महायुती सरकारने राबविल्या आहेत. या सर्व योजनांची सविस्तर माहिती यावेळी दिली.

मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून द्या, असे आवाहन यावेळी केले.

संबंधित पोस्ट

डाक विभागाच्या” ज्ञान पोस्ट” सेवेला 1 मे पासुन सुरुवात..

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

सह्याद्री व्याघ्र व चांदोली राष्ट्रीय उद्यानातील बाधीत गावांच्या पुनर्वसनाच्या कामांचा**जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी घेतला आढावा*

vishwatmaklokswamivarta

नागपूर येथील विधीमंडळाच्या विस्तारित इमारतीत हिरकणी कक्षाचे उद्घाटन. 

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी: पालघर जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का, खासदार-आमदारासह जिल्हाप्रमुख शिंदे गटात

टपाली मतदानासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्या-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta