मतदार जनजागृतीसाठी दोन लाख महिलांपर्यंत पोहोचण्याचा‘उमेद’चा निर्धार
छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी महिला मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महिला बचतगटांमार्फत जिल्ह्यातील किमान २ लाख महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार ‘उमेद’च्या महिला बचतगटांच्या महिलांनी केला. आज बँक ऑफ महाराष्ट्र, क्षेत्रिय कार्यालयामध्ये जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे यांच्या अध्यक्षतेखाली उमेदच्या आर्थिक साक्षरता सखी मेळावा घेण्यात आला.
बँक ऑफ महाराष्ट्र चे अंचल प्रबंधक विवेक नाचणे, जिल्हा अग्रनी बँक प्रबंधक मंगेश केदार,मुख्य प्रबंधक प्रवीण पुर्भे,आरसेटीचे संचालक मंगेश देशमुख, जिल्हा अभियान व्यवस्थापक, ग्रामोन्नती अभियान श्रीमती सुचेता खोतकर, संचालक, RSeti व वरिष्ठ अधिकारी श्रीमती अनिता गाडेकर उपस्थित होते.
येत्या २० नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. त्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदार जनजागृती उपक्रम राबविण्यात येत आहे.छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उमेद अंतर्गत २० हजार बचत गट आहेत. प्रत्येक बचत गटामध्ये सर्व साधारण १० महिला असतात. या महिला बचत गटांवर सर्व नियंत्रण आर्थिक साक्षरता सखी मार्फत होते. आजच्या मेळाव्यात समन्वयक महिलांनी आपापल्या अंतर्गत बचतगटांपर्यंत संदेश पोहोचवून दोन लाख महिलांपर्यंत हे मतदार जनजागृती अभियान पोहोचवावे, अशी सुचना डॉ. भोकरे यांनी केली