*वाई विधानसभा मतदार संघाची निवडणुकीसाठी तयारी पूर्ण*
सातारा प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या अनुषंगाने 256 वाई विधानसभा मतदार संघामधील आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी निवडणुकीसाठी तयारी पूर्ण झाली आहे. सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदान करुन आपला लोकशाहीचा हक्क बजवावा असे आवाहन सहा. मतदान अधिकारी तथा तहसिलदार महाबळेश्वर श्रीमती तेजस्वीनी पाटील यांनी केलेले आहे.
256 वाई विधानसभा मतदारसंघाच्या तयारीच्या अनुषंगाने महाबळेश्वर तालुक्यातील सर्व भागातील बी एल ओ यांना व्होटर स्लिप, बी एल ओ रजिस्टर, अंतिम मतदार याद्यांचे वाटप करणेत आले आहे0000