vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न दिव्यांग मतदारांचे क्षेत्रीयस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

दिव्यांग मतदार जनजागृती कार्यक्रम संपन्न दिव्यांग मतदारांचे क्षेत्रीयस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी विविध उपाययोजना- जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

 

जालना, प्रतिनिधी:- जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांसाठी स्वीप कार्यक्रमातंर्गत जालना जिल्ह्याचे दिव्यांग आयकॉन डॉ.निकेश मदारे यांच्यासोबत मागील काही दिवसापासून स्वीपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचण्याचे काम झाले आहे. जवळपास 3 हजार मतदारांपर्यंत प्रत्यक्ष पोहोचण्याचे काम करण्यात येवून क्षेत्र भेटीसुध्दा दिलेल्या आहेत. दिव्यांग मतदारांचे क्षेत्रीयस्तरावरील प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर व्हिलचेअरचे वाटप व दिव्यांग मतदान जनजागृती कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आज घेण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी दिव्यांग आयकॉन डॉ. निकेश मदारे, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, दिव्यांग कक्ष नोडल अधिकारी अनंत कदम, सहायक नोडल अधिकारी अतिश ससाणे, श्री. अंभोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात जवळपास 14500 दिव्यांग मतदार आहेत. त्यांच्यात जनजागृती होण्याच्या उद्देशाने स्वीप कक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व मतदान केंद्रावर व्हीलचेअर वाटपाचा कार्यक्रम आज घेण्यात आला. सर्व दिव्यांगाना मतदान करतांना सुलभता यावी यासाठी ब्रेल लिपीमध्ये मतपत्रिका तसेच अंध मतदारासाठी ब्रेल व्होटर स्लिप येथून वाटप करण्यात येत आहे. तसेच साईन लॅग्वेजही तयार केलेली आहे. हे सर्व संबंधित दिव्यांग मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने सक्षम ॲप कार्यान्वित केलेले आहे. यावर नोंदणी केलेल्या दिव्यांगांना मतदार केंद्रावर घेवून येणे व मतदानानंतर घरी नेवून सोडणे, तसेच ज्या दिव्यांग मतदारांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही त्यांच्यासाठी गृह मतदान करुन घेण्यात येत आहे. अशी माहिती दिव्यांग आयकॉन डॉ. मदारे यांनी यावेळी दिली. यावेळी “आम्ही मतदान करणार आहेत, आपणही अवश्य मतदान करा,” असे आवाहन उपस्थित सर्व दिव्यांग मतदारांनी जिल्ह्यातील सर्व मतदारांना उद्देशून केले.

संबंधित पोस्ट

शहराध्यक्षांनी कसबा निवडणुकीवरुन रूपाली पाटलांना झापलं

vishwatmaklokswamivarta

अंबडमध्ये शिवसेना दलित आघाडीचा कार्यकर्ता मेळावा

शिवसेना नेते रामदास कदम यांनी आज पत्रकार परिषदेत महत्वाचे विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

vishwatmaklokswamivarta

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांचा होणारा सत्कार अभिमानाची गोष्ट – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ अंतर्गत गेट वे ऑफ इंडिया येथे ‘मुंबई वॉक’ कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन मतदार नोंदणीसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध- विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

vishwatmaklokswamivarta