मुंबईतील वांद्रे विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना पुन्हा निवड देण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रमुख अजित पवार यांनी केले
मुंबईतील वांद्रे विभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांचे पुत्र झिशान सिद्दिकी यांना पुन्हा निवड देण्याचे आवाहन राष्ट्रवादी प्रमुख अजित पवार यांनी केले
मुंबई प्रतिनिधी
मुंबईतील वांद्रे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीचे उमेदवार झिशान सिद्दिकी यांच्या प्रचार सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रमुख अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दिवंगत नेते बाबा सिद्दिकी यांच्या समाजसेवेचा वारसा चालवणाऱ्या त्यांच्या चिरंजीवीला पुन्हा निवडून आणण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तथा महायुतीचे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार श्री. झिशान सिद्दीकी यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते स्व. बाबा सिद्दीकी यांच्या समाजसेवेचा वारसा त्यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी हे नेटानं पुढे चालवतील, यात काही शंका नाही. सिद्दीकी परिवार जनतेच्या प्रश्नांचं, समस्यांचं निराकरण करण्यास कायम प्राधान्य देत आलं आहे आणि यापुढे देत राहील.
या मतदारसंघाला विकासाच्या दिशेनं पुढे घेऊन जाण्यासाठी तुमचं-आमचं हक्काचं महायुती सरकार पुन्हा निवडून येणं आवश्यक आहे. विकास कामांना पूर्णत्वास नेण्यासाठी झिशान हे सक्षम आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत झिशान यांना प्रचंड मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, असं आवाहन करतो.