या विधानसभेच्या निवडणुकीत तरुण उमेदवारांना निवडून दयावे – अशोक एन.जे . संस्थापक अध्यक्ष इंको फ्रेंडली लाईफ , तरुण तगडा भारत
( सुरेश गायकवाड मुंबई प्रतिनिधी- इको फ्रेंडली लाईफ व तरुण तगडा भारत या संस्थेच्या विद्यमाने येत्या विधानसभेच्या निवडणुकीत तरुण उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन मतदार बांधवांना या संस्थेचे अध्यक्ष अशोक एन . जे यांनी मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत केले आहे .
यावेळेस त्यांनी सांगितले की , देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली आहे. तरी येथील जनतेला आपल्या हक्कांसाठी झगडावे लागते आहे. परंतु त्यांना न्यायहक्क मिळत नाही . त्यासाठी 1 कोटी जे घाणेरडे राज्यकर्ते आणि त्यांची प्रशासकीय यंत्रणा जबाबदार आहे . त्यासाठी 139 कोटी जनतेतील तरुणांनी पुढे येऊन राजकारणाची कास धरली पाहिजे तरच देशाचा विकासं आहे , अन्यथा हे सूडाचे राजकारण असेच सुरु राहिल . यासाठी तरुणांनी राजकारणाबाबत आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे . आणि त्या तरुणांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत. कारण गेली 21 वर्ष याविषयी आमचे संशोधनपर अभ्यास सुरु आहे .
आणि येत्या विधानसभेच्या निवडणुकीत कोणत्या पक्षात उभे असणाऱ्या तरुण उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले .