*लागलेली भुक* फाटलेला खिसा *तुटलेलं मन* आणि मिळालेली *वागणूक* आयुष्य जगण्याची कला *शिकवते…..!*
*रेल्वेचे रुळ हजारो किलोमीटर अंतर साथ साथ चालतात; पण ते जवळ मात्र कधीच येत नाहीत… त्याच प्रमाणे कोणीतरी स्व:ता चं अस्तित्त्व विसरल्याशिवाय त्याला दुस-याशी एकरुप होताच येत नाही हेही तितकच खरं…*_
*आयुष्यात नेहमी सांभाळून चालायचं असत, कोणी कौतुक केलं की हुरळून जायचं नसतं, कारण कौतुकाच्या पुलाखाली मतलबाची नदी वाहत असते हे कधीच विसरता कामा नये…!*
अडचणीच्या वेळी सगळ्यात मोठा आधार म्हणजे स्वतः वरचा विश्वास…! जो मंद हास्य करत तुमच्या कानात प्रेमाने सांगत असतो, सगळं व्यवस्थित होईल…!!*
*समजूत घालायला कुणी नसलं की स्वतःलाच बळ आणावं लागत !!*_
*ज्यांचे डोळे चांगले ते जगाच्या प्रेमात पडतात, पण ज्यांची जीभ गोड असेल तर जग त्यांच्या प्रेमात पडते…!*_
*एक व्यक्ती म्हणून मोठं होताना, कधीही माणूस म्हणून छोटे होऊ नका…*
_*प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर आपल्या जीवनात काही ना काही उद्देशानेच आणत असतो. कोणी आपल्याला केवळ अजमावून जाते, कोणी आपल्याला ज्ञान देऊन जाते, कोणी वापर करून जाते तर कोणी जगण्याचा खरा अर्थ शिकवून जाते.*_
*जगातील सर्वात मूल्यवान गोष्ट काही असेल तर ती म्हणजे तुमचा आताचा वर्तमान क्षण. तो एकदा गेला की पूर्ण जगाच्या संपत्तीने देखील खरेदी करता येणार नाही.*_