vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जिल्ह्यात 2 हजार 680 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

जिल्ह्यात 2 हजार 680 मतदारांनी बजावला गृह मतदानाचा हक्क

 

रायगड प्रतिनिधी- भारत निवडणूक आयोगाने 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आणि 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घरबसल्या मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

जिल्ह्यात दि.16 नोव्हेंबर अखेर पर्यंत एकूण 2 हजार 680 मतदारांनी गृह मतदानाचा हक्क बजावला.

 188-पनवेल विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 124 ज्येष्ठ नागरिकांनी, 13 दिव्यांग मतदार असे एकूण 137 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

189-कर्जत विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 158 ज्येष्ठ नागरिकांनी, 17 दिव्यांग मतदार असे एकूण 175 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

 190-उरण विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 66 ज्येष्ठ नागरिकांनी, 16 दिव्यांग मतदार असे एकूण 82 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

191-पेण विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 545 ज्येष्ठ नागरिकांनी, 58 दिव्यांग मतदार असे एकूण 603 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

192-अलिबाग विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 442 ज्येष्ठ नागरिकांनी, 27 दिव्यांग मतदार असे एकूण 469 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

193-श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 423 ज्येष्ठ नागरिकांनी, 107 दिव्यांग मतदार असे एकूण 530 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला.

194-महाड विधानसभा मतदारसंघ 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 571 ज्येष्ठ नागरिकांनी, 113 दिव्यांग मतदार असे एकूण 684 मतदारांनी घरबसल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गोपनीय पद्धतीने मतदान करण्याची सुविधा पुरविण्यात येऊन संबधित विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्त करण्यात आलेल्या क्षेत्रीय अधिकारी, मतदान अधिकारी तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी गृह मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. यावेळी ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांनी निवडणूक आयोगाचे आभार मानले.

०००००

संबंधित पोस्ट

होळीच्या हार्दिक शुभेच्छा

कराड विमानतळाचे विस्तारीकरण व नाईट लँडींगची कामे वर्षभरात पूर्ण करण्यास प्राधान्य -पालकमंत्री शंभुराज देसाई

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे कौतुक, विवेक अग्निहोत्री-पल्लवी जोशी यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्र्यांच्या 14 मे रोजी होणाऱ्या मेळाव्याआधी भाजपकडून टीका करणारे व्यंगचित्र शेअर

जागर स्त्रीशक्तीचा संवाद कार्यशाळासशक्त समाज निर्मितीत महिलांची भुमिका मोलाची- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

राज्यात अतिवृष्टीची शक्यता, आता पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट; कामाशिवाय घराबाहेर पडू नका !