
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 :पोलीस निरीक्षक के. नारायण नाईक यांची आचारसंहिता, माध्यम कक्षास भेट
सांगली प्रतिनिधी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी पोलीस निरीक्षक के. नारायण नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन केलेल्या आचारसंहिता कक्ष, सीव्हीजल कक्ष व माध्यम कक्षास भेट देवून तेथून करण्यात येत असलेल्या कामकाजाबाबत माहिती घेवून सर्वांनी दक्ष राहून कामकाज करण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा आचारसंहिता कक्षाच्या नोडल अधिकारी ज्योती पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी यासीन पटेल, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
00000



