vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी- चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूं ची धमाकेदार कामगिरी…

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी- चीनचा पराभव करुन रचला नवा इतिहास भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला. भारतीय खेळाडूं ची धमाकेदार कामगिरी…

 

खेळ प्रतिनिधी –

बिहारमधील राजगीर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय महिला संघाने तिरंगा फडकावला आणि चीनचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले. भारताने अंतिम फेरीत चीनचा 1-0 असा पराभव केला.भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत बहुतांश वेळा चेंडू आपल्या नियंत्रणात ठेवला तर दुसरीकडे चीनच्या खेळाडूंना सामन्यात एकही गोल करता आला नाही. भारतासाठी सामन्यातील एकमेव गोल दीपिकाने केला आणि तिच्या गोलच्या जोरावर भारताला विजेतेपद मिळवण्यात यश आले.

सलीमा टेटे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये वर्चस्व गाजवले आणि संपूर्ण स्पर्धेत एकही सामना गमावला नाही. भारताने उपांत्य फेरीत जपानचा पराभव केला होता. भारताने तिसऱ्यांदा (2016, 2023, 2024) आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्हास्तर खेलो इंडिया केंद्रातील खो-खोखेळाच्या क्रीडा मार्गदर्शकासाठी अर्ज सादर करावेत   

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा  याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला…

vishwatmaklokswamivarta

जोहान्सबर्गमधून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगणार तोच  खेळावर पावसाचं सावट.

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन

युवकांनी जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी व्हावे- जिल्हाधिकारी आशिष येरेकर

vishwatmaklokswamivarta

इंडियन प्रीमिअर लीग २०२१चा दुसरा टप्पा उद्यापासून यूएईत सुरू होत आहे.

vishwatmaklokswamivarta