vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळठळक बातम्या

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा  याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला…

ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू नीरज चोप्रा  याने आता जागतिक चॅम्पियनशिपमध्येही इतिहास रचला…

क्रीडा प्रतिनिधी

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे. अंतिम फेरीतील दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.17 मीटर अंतर पार करून पदक जिंकले आहे.

 

भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने 88.17 मीटर भाला फेकत सुवर्ण पदक मिळवलं आहे. ही स्पर्धा 1983 पासून आयोजित केली जात असून 40 वर्षात पहिल्यांदाच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने 87.82 मीटर भाला फेकत रौप्यपदक जिंकले. या सुवर्ण कामगिरीनंतर नीरज चोप्रावर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. सुवर्णपदक मिळवल्यानंतर नीरज चोप्राने महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे

हे ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने हृदयस्पर्शी अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आता काय सांगू, सगळे फक्त एवढंच म्हणायचे की, हेच पदक (वर्ल्ड चॅम्पियनशिपमधलं सुवर्ण) बाकी आहे. पण तेही आज पूर्ण झालंय. फक्त 90 मीटरच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहिलं आहे, आज होईल असं वाटत होतं, पण सुवर्णपदक जास्त महत्त्वाचं होतं. आता आपल्याकडे हे आहे. आता स्पर्धा आणखी कठीण आहे. वेळ पडल्यास त्याच्यावर अधिक मेहनत घेईन, असे नीरजने म्हटलं आहे.

संबंधित पोस्ट

वॉक फॉर दि नेशन”Walk For The Nation“कारगिल विजय दिवस” रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने दि.२६ जुलै रोजीलोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह, भायखळा येथे पारंपारिक फॅशन शो चे आयोजन

मुंबईतील दादर चैत्यभूमीवर अभिवादन, वानखेडेंच्या विरोधात घोषणाबाजी; तर प्रकाश आंबेडकरांशीही चर्चा..

vishwatmaklokswamivarta

राज्यात नागरी भागात तुकडेबंदी कायदा रद्द महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेची विधानसभेत घोषणाआदर्श कार्यप्रणाली तयार करण्यात येणार· ५० लाख कुटुंबांना लाभ

देशाला १९४७ ला फक्त राजकीय स्वातंत्र्य मिळालं – विश्व हिंदू परिषद

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४-सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ९१० तक्रारी प्राप्त; यापैकी ८९९ निकाली ३४ कोटी ६२ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

vishwatmaklokswamivarta

सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे पुन्हा मैदानात, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी जाहीर