मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.
नवीदिल्ली प्रतिनिधी:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रविवारी त्यांच्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ च्या 150 वा भाग झाला. या 150 व्या भागात त्यांनी देशातील ‘मेड इन इंडिया’ ॲनिमेशनच्या यशाचा गौरव केला. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात म्हटले की, भारत ॲनिमेशनच्या जगात एका नव्या क्रांतीच्या मार्गावर आहे.
तसेच भारतीय गेमिंगचे क्षेत्रही वेगाने विस्तारत आहे. भारतीय गेमिंगचे क्षेत्र जगभरात लोकप्रिय होत आहे. छोटा भीम, कृष्णा, आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख तसेच ‘मन की बात’मध्ये पंतप्रधानांनी छोटा भीम, कृष्णा, हनुमान आणि मोटू-पतलू यांसारख्या ॲनिमेशन पात्रांच्या लोकप्रियतेचा उल्लेख केला.
याचा उल्लेख करताना नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, हे पात्र केवळ भारतातच नाही तर इतर देशांमध्येही मुलांना आकर्षित करत आहे. जगभरात आपल्या भारतीय ॲनिमेशन चाहते आहेत. त्यांनी देशवासियांना ॲनिमेशनच्या जगात भारताला जागतिक महासत्ता बनविण्याची शपथ घेण्याचे आवाहन केले आहे
दरम्यान मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये, अक्षरा आणि प्रकृती या मुंबईच्या दोन लेकींनी शिवणकाम करताना शिल्लक राहिलेल्या कपड्यांद्वारे तयार केलेल्या फॅशन उत्पदनांचे कौतुक केले.