vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारणस्थानिक बातम्या

मुख्यमंत्री भाजपाचा होणार परंतु ते कोण अजूनही गुलदस्त्यात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का? राजकीय वर्तुळात चर्चा…

मुख्यमंत्री भाजपाचा होणार परंतु ते कोण अजूनही गुलदस्त्यात! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का? राजकीय वर्तुळात चर्चा…

 

राज्य प्रतिनिधी-मुख्यमंत्री भाजपाचा होणार परंतु ते कोण असणार ते अजूनही गुलदस्त्यात ,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार -विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जागा मिळतील, असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना देखील इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहचला आणि शिंदे गटाचे सर्व गणित बिघडल्याचे बोलले जात आहे.

भारतीय जनता पार्टीने कोणताही निर्णय घ्यावा आम्ही त्यांच्यासोबत आहोत म्हणून माझी कुठलीच अडचण असणार नाही असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना सांगितल्याची माहिती पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिली होती एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय, भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली.

आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे. याकरता भारतीय जनता पार्टी दुसऱ्या नवीन चेहऱ्याला ही संधी देण्याची शक्यता वर्तनात येत आहे

संबंधित पोस्ट

जी.डी.सी.अँड ए व सी.एच.एम. परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 7 मार्च पर्यंत वाढविली

फिनटेक उद्योजकांनी घेतली राज्यपालांची भेट

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्र्यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध विकास कामांचे उद्घाटन

प्रस्तावित बांबू क्लस्टर मुरुड येथे जिल्हाधिकारी किशन जावळे यांची भेट

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस महामार्गावरील वाकोला ब्रिजवर वाकोला येथेअपघात, एक ठार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे काम सर्व यंत्रणांनी समन्वयाने करावे– जिल्हाधिकारी किशन जावळे

vishwatmaklokswamivarta