vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

किया इंडिया कार- यांनी जून २०२० पासून अनंतपूर उत्पादन केंद्रातून निर्यात सुरू केल्यापासून १,००,००० CKD वाहनांच्या निर्यातीचा टप्पा पार

किया इंडिया कार- यांनी जून २०२० पासून अनंतपूर उत्पादन केंद्रातून निर्यात सुरू केल्यापासून १,००,००० CKD वाहनांच्या निर्यातीचा टप्पा पार

व्यावसायिक प्रतिनिधी

किया इंडिया कार- यांनी जून २०२० पासून अनंतपूर उत्पादन केंद्रातून निर्यात सुरू केल्यापासून १,००,००० CKD वाहनांच्या निर्यातीचा टप्पा पार केला आहे

किया इंडिया हे किया कॉर्पोरेशनसाठी एक महत्त्वाचे निर्यात केंद्र असून, कंपनीच्या एकूण CKD निर्यातीपैकी ५०% हिस्सा भारतातील आहे.

किया इंडिया २०२४ मध्ये उझबेकिस्तान, इक्वाडोर आणि व्हिएतनाम बाजारपेठांमध्ये ३८,००० हून अधिक CKD युनिट्स निर्यात करण्याची क्षमता आहे. सेल्टॉस, सोनेट आणि कॅरन्स या मॉडेल्सच्या बाजारपेठेतील यशामुळे स्पर्धात्मक किंमती व उत्पादनाची गुणवत्ता यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या महत्त्वपूर्ण टप्प्याबाबत किया इंडियाचे मुख्य विक्री अधिकारी, जून्सू चो म्हणाले: “किया कॉर्पोरेशनसाठी भारत हे केवळ एक मजबूत विक्री केंद्रासोबत एक उदयोन्मुख निर्यात केंद्र देखील आहे. या टप्प्यामुळे किया इंडियाची उत्पादनातील उत्कृष्टता, नाविन्यपूर्णता आणि जागतिक ग्राहकांना मूल्य प्रदान करण्याच्या वचनबद्धतेचा प्रत्यय येतो. सेल्टॉस, सोनेट आणि कॅरन्स मॉडेल्सचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांतील उत्कृष्ट प्रदर्शन पाहून आम्हाला अभिमान वाटतो. यासाठी सरकारच्या निर्यात-मैत्रीपूर्ण धोरणांचेही आम्ही आभारी आहोत, ज्यामुळे जागतिक ऑटोमोटिव्ह मूल्यसाखळीत भारताची भूमिका अधिक मजबूत झाली आहे. भविष्याकडे पाहताना, आम्ही मध्यपूर्व व आफ्रिका बाजारपेठांमध्ये CKD निर्यातीचा विस्तार करून २०३० पर्यंत निर्यात क्षमतेत दुप्पट वाढ करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

संबंधित पोस्ट

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना-देशात महाराष्ट्र आणि राज्यात छत्रपती संभाजीनगर प्रथम

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम; योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना

जिल्हा सैनिक कार्यालय येथे अशासकीय पदभरती

vishwatmaklokswamivarta

जुन्या व निरुपयोगी वाहनांच्या ‘स्क्रॅपिंग’साठी राज्यात ६ केंद्रांना मान्यता

vishwatmaklokswamivarta