
जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिल्या की ,माझ्यासाठी धारावी म्हणजे फक्त झोपडपट्टीचा पुनर्विकास नाही. शाश्वत भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल.
राज्य प्रतिनिधी
जेम अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलने आयोजित केलेल्या इंडिया जेम अँड ज्वेलरी अवॉर्ड्सच्या कार्यक्रमात बोलताना अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल आणि राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा हे देखील उपस्थित होते. मेळाव्याला संबोधित करताना, गौतम अदानी यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला आणि जागतिक प्रतिष्ठेला आकार देण्यासाठी रत्न आणि दागिने उद्योगाची महत्त्वपूर्ण भूमिका कशी आहे ती सांगितली.
गौतम अदानी यांच्यावर एकीकडे वेगवेगळे आरोप होत असताना त्यांनी कार्यक्रमामध्ये बोलताना याला उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आव्हाने आपल्याला अधिक मजबूत बनवतात. अमेरिकेतील आरोपांवर ते म्हणाले की, अदानी समूहाविरुद्ध कोणतीही एफसीपीए (फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस) कारवाई केली जाणार नाही.
अदानी म्हणाले की, ज्वेलरी उद्योग हे एक पॉवर हाऊस आहे. ज्यामुळे 50 लाख लोकांना रोजगार मिळते. आयटी क्षेत्राच्या बरोबरीचे हे क्षेत्र आहे. रत्ने आणि दागिन्यांच्या निर्यातीत 14% घट झाल्याबद्दल काळजी करण्याची गरज आहे. यावर काम करावे लागेल. प्रयोगशाळेत बनलेले हिरे वैज्ञानिक नवनिर्मितीद्वारे बाजारपेठेत व्यत्यय आणणारे बनले आहेत. अमेरिकेने त्यांना नैसर्गिक हिऱ्यासारखी ओळख दिली आहे. त्यांची किंमत नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा कमी आहे. हा भविष्याचा हिरा आहे, जो आपल्याला स्वीकारावा लागेल. दरम्यान आदानी धारावी पुनर्वसन प्रकल्पावर बोलताना म्हणाले की,माझ्यासाठी धारावी म्हणजे फक्त झोपडपट्टीचा पुनर्विकास नाही. शाश्वत भविष्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. यामुळे लाखो लोकांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी मिळेल.
अमेरिकेच्या आरोपांचा संदर्भ देत गौतम अदानी म्हणाले की, ‘अमेरिकेतून आमच्यावर काही आरोप झाले होते, पण मला हे स्पष्ट करायचे आहे की अदानी समूहातील कोणत्याही व्यक्तीला फॉरेन करप्ट प्रॅक्टिसेस ॲक्ट (FCPA) अंतर्गत कोणत्याही आरोपांना सामोरे जावे लागणार नाही. नकारात्मकता झपाट्याने पसरते, पण ती आपली प्रगती थांबवू शकत नाही.



