vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींनी रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींनी रमाई आवास योजनेचा लाभ घ्यावा – सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे

 

          सांगली, प्रतिनिधी : राज्यातील ग्रामपंचायत, नगरपरिषद व महानगरपालिका क्षेत्रातील अनुसूचित जाती व नवबौध्द व्यक्तींना पक्क्या घराचे बांधकाम करणे, कच्च्या घराचे पक्क्या घरात रुपांतर करणे, शासकीय अभिकरणामार्फत घर खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासाठी प्रति लाभार्थी 1 लाख 20 हजार रूपये आणि शहरी भागासाठी 2 लाख 50 हजार रूपये अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत रमाई आवास योजनेतून दिले जाते. जिल्ह्यातील पात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सांगली कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी केले आहे.    महानगरपालिका क्षेत्रासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण सांगली, जुना बुधगांव रोड मांगली व सांगली मिरज व कुपवाड शहर महानगरपालिका या कार्यालयाशी, नगरपालिका क्षेत्राकरिता संबंधित मुख्याधिकारी नगरपरिषद/ नगरपंचायत कार्यालयाशी व ग्रामीण क्षेत्राकरिता संबंधित ग्रामपंचायत व पंचायत समिती कार्यालयाकडे अर्ज करता येईल.   अर्ज करताना जागेचा 7/12 उतारा / मालमत्ता नोंदपत्र / 8 अ उतारा, जातीचा दाखला, रहिवासी व उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, आधारकार्ड, घरपट्टी/ पाणीपट्टी/ वीजबिल इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत. या योजनेतून लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागासाठी व्यक्तीची कमाल उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजार रूपये व शहरी भागासाठी 3 लाख रूपये इतकी आहे.

संबंधित पोस्ट

नवी मुंबई :शिवसेनेकडून पैशांची ऑफर, षडयंत्र रचायला भाग पाडलं; महिलेकडून गणेश नाईकांविरोधातील बलात्काराची तक्रार अखेर मागे…

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

अहमदाबाद विमान दुर्घटनेत  एअर इंडियाच्या 171 विमानाचे कॅप्टन-सुमित सभरवालांच्या 85 वर्षीय पित्याकडून अखेरचा निरोप

निर्लेखित साहित्याच्या विक्रीसाठी इच्छुक जी.एस.टी.नोंदणीधारक खरेदीदारांनी निविदा सादर कराव्यात.

अभिनेत्री तुनिषा शर्माच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका आंतरशालेय सांस्कृतिक चषक स्पर्धा जल्लोषात संपन्न सर्वोत्तम गुण संपादन करत ऐरोलीचे विबग्योर हायस्कूल सांस्कृतिक चषकाचे मानकरी