vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 अखेर सादर करा…

 जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 अखेर सादर करा…

 

[ सांगली, प्रतिनिधी: सन 2024-25 या चालू शैक्षणिक वर्षात इयत्ता 12 वी विज्ञान शाखेमध्ये व पदविका तृतीय वर्षात शिकत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व सा.शै.मा.प्र./मराठा (एससी, व्हीजे, एनटी, ओबीसी, एसबीसी, एसईबीसी) या संवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी विहित नमुन्यातील जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या शिफारसीसह दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत समिती कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव मेघराज भाते यांनी केले आहे.

   सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी (3 वर्षे / 5 वर्षे विधी), बी.बी.ए., बी.सी.ए., एम.बी.ए., एम.सी.ए. व बी. एड्. इत्यादी व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव प्रवर्गात लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यास प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करणे अत्यावश्यक असते. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज 31 जानेवारी 2025 पर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शैक्षणिक संस्थांनीही विद्यार्थी/ पालक यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करुन समितीकडे मुदतीत अर्ज सादर करणेबाबत सूचना निर्गमित कराव्यात, असे पत्रकात म्हटले आहे.

 अर्जदारांनी www.barti.maharashtra.gov.in cast validity या संकेतस्थळावर विहित नमुन्यातील ऑनलाईन अर्ज भरावा. महाविद्यालयीन शिफारसपत्र, 15 ए फॉर्मवर प्राचार्यांची सही, शिक्का व चालू वर्षाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, जातीविषयक सर्व पुरावे व विहित नमुन्यातील शपथपत्रासह सर्व मूळ कागदपत्र ऑनलाईन अपलोड करावे व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची हार्डकॉपी कागदपत्रांच्या/ पुराव्यांच्या साक्षांकित प्रतीसह समितीकडे सादर करावे. अर्ज सादर करतेवेळी अर्जदार/ पालक यांनी समक्ष मूळ कागदपत्रांसह उपस्थित रहावे, असे आवाहनही श्री. भाते यांनी केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

आ. सुधीर मुनगंटीवार यांचा विधानसभेत ऐतिहासिक विक्रम !अर्थसंकल्पीय अधिवेशनात तब्‍बल ३९ अशासकीय विधेयके विचारार्थ समृध्‍द लोकशाहीसाठी आश्‍वासक बाब…

vishwatmaklokswamivarta

गोवा पोलिसांनी अर्पोरा नाईट क्लबमध्ये लागलेल्या भीषण आगीनंतर जनरल मॅनेजर आणि तीन कर्मचाऱ्यांसह चार जणांना अटक

vishwatmaklokswamivarta

10 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणी शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि अन्य तिघांना अटक

vishwatmaklokswamivarta

आत्मनिर्भर भारत: लखनौ येथील उत्तर प्रदेश संरक्षण कॉरिडॉर अंतर्गत ब्रह्मोस इंटिग्रेशन अँड टेस्टिंग फॅसिलिटी सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या ब्रह्मोस क्षेपणास्त्रांच्या पहिल्या तुकडीला संरक्षण मंत्री आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवला हिरवा झेंडा

vishwatmaklokswamivarta

इंदापूर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश आणि दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचे उद्घाटन संपन्न,जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय इमारतीच्या बांधकामासाठी अतिरिक्त ८ कोटी रुपयांची तरतूद करणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

गाझा’साठी गुगलच्या कार्यालयात आंदोलन करणार्‍या २८ ‘गाझाप्रेमी’ कर्मचार्‍यांचे निलंबन !सनातनचे धार्मिक विधीविषयीचे ॲप बंद करण्यामागेही ‘गाझा’फेम साम्यवादी मानसिकता; दोषींवर गुगलने कारवाई हवी ! – सनातनची मागणी