vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा राजभवन, मुंबई येथे आरंभ

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा राजभवन, मुंबई येथे आरंभ

 

मुंबई प्रतिनिधी

सशस्त्र सेना ध्वज दिनाच्या ७५ व्या (अमृतमहोत्सवी) वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातर्फे आयोजित सशस्त्र सेना ध्वज निधी संकलन मोहिमेचा राजभवन, मुंबई येथे आरंभ केला.

देशाच्या सीमेवर सैन्यदलाच्या जवानांच्या जागत्या पहाऱ्यामुळे देशातील नागरिक सुखाने राहू शकतात व देश प्रगती करू शकतो. ही जाणीव ठेवून प्रत्येकाने सशस्त्र सैन्यदल ध्वजनिधीला आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

यावेळी गेल्या वर्षभरात ध्वज निधी संकलनाच्या कार्यात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते विविध शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रमुखांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक संस्थांनी तसेच व्यक्तींनी ध्वजनिधीला आपले योगदान दिले.

कोकणचे विभागीय आयुक्त राजेश देशमुख, नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम, नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर, मुंबईचे जिल्हाधिकारी संजय यादव, यवतमाळचे जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया आदींना यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

संबंधित पोस्ट

राजेंद्र जाधव यांना जालना विधानसभेची उमेदवारी द्या; कार्यकर्त्यांची मागणी

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर मनोज जरांगेचं आमरण उपोषण सुरू 

vishwatmaklokswamivarta

राज्यातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासाठी , शिंदे-फडणवीस सरकारला दोन महिन्यांची मुदत मनोज जरांगे पाटील यांनी  उपोषण स्थगित केले.

vishwatmaklokswamivarta

विकसित महाराष्ट्राच्या ध्येयपूर्तीसाठी आयबीएम कंपनीचे सहकार्य आवश्यक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भारत निवडणूक आयोगाने इतर देशांच्या निवडणूक व्यवस्थापन सस्था  यांच्याबरोबर आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि सहभागासाठी इंटरनॅशनल इलेक्शन विजिटर प्रोग्राम कार्यक्रम आयोजित केला

जिल्ह्यात विविध क्षेत्रात 1 हजार कोटीहून अधिक गुंतवणक करण्यासाठी उद्योजकांचा शासनाबरोबर सामंजस्‌य करारजिल्ह्यात 3 हजाराहून अधिक होणार रोजगार निर्मिती होणार