vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर मनोज जरांगेचं आमरण उपोषण सुरू 

मराठा आरक्षणाचा मुद्द्यावर मनोज जरांगेचं आमरण उपोषण सुरू …

 

राज्य प्रतिनिधी-अंतरवली सराटी येथेआजपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे, पुन्हा एकदा आपल्या मागण्याकरिता आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह उपोषणाची सुरुवात झाली,उपोषणाला बसण्यापूर्वी मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मराठ्यांची बेइमानी करणार नाही असे म्हणाले ते आम्हाला न्याय देतील असेही ते म्हणाले

मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लाढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली, मात्र आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या आपल्या मागणीवर अजूनही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी आज पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे.

जानेवारीपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं आहे. उद्या 26 जानेवारी रोजी सगे सोयरे कायद्याच्या अधिसूचनेला एक वर्ष होत आहे. मराठा समाज 1 वर्षापासून रस्त्यावर झुंजतोय. 1 वर्ष लागतं सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायला. मराठा समाजाची जान सरकारला नाहीये, अशी टीका त्यांनी केली.

 सरकारला मराठ्यांच्या मागण्या माहिती आहे, सरकारने मराठ्यांच्या मागण्यांची तातडीने अंमलबजावणी करावी. मुख्यमंत्री मराठ्यांशी बेइमानी करणार नाही याची खात्री आहे. मुख्यमंत्र्यांनी जाणीव ठेवावी, असेही जरांगे म्हणाले.

संबंधित पोस्ट

आयटीआय बेलापूरमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त-विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धाचे आयोजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

आयआयटी संस्थांनी देशाच्या विकासात मोलाचा वाटा उचलला आहे आणि अभियंते हे आधुनिक भारताचे शिल्पकार आहेत – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. 

ड्रोन उड्डाणास प्रतिबंध

डिफेन्स क्लस्टर तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण सामुग्री उत्पादनांसाठी आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह- छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना संरक्षण मंत्र्यांचे निमंत्रण…

विदेशी गुंतवणूकीसाठी ‘महाराष्ट्र’ भारताचा गेट वे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

धर्मांतर करून आरक्षणाचा लाभ घेत असलेल्यांवर कारवाई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta