vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील मालाड दिंडोशी मध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक!

 मुंबईतील मालाड दिंडोशी मध्ये अग्नीतांडव; खडकपाडा फर्निचर मार्केटला भीषण आग, ५ गोदामं जळून खाक!

 

मुंबई प्रतिनिधी-

मालाड खडकपाडा परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. क्षणात आगीचा भडका उडाला व व आसपासच्या अन्य गोदामांपर्यंत पसरली. परिसरातील एका गोदामाला आग लागली होती. क्षणात आगीचा भडका उडाला व व आसपासच्या अन्य गोदामांपर्यंत पसरली. लाकडी साहित्यांचे गोदाम असल्याने आग प्रचंड वेगाने पसरली व आगीचा मोठा भडका उडाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार: मुंबई पूर्व असलेल्या मालाड परिसरात भीषण आगीची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी दरम्यान खडकपाडा परिसरातील फर्निचरच्या गोदामांना आग लागली आहे. सुरुवातीला एका फर्निचरच्या गोदामाला लागलेली आग अन्य गोदामांत पसरली. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी अनेक गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. संपूर्ण आकाशात आग व काळ्या धुराचा प्रचंड लोळ उठल्याचे दिसत आहे. धूर दूर अंतरावरून दिसत असल्याने आगीची तीव्रता लक्षात येते.

आगीत मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. नेमकी आग कशामुळे लागली,याची माहिती अद्याप समोर आली नाही. लोकांची वर्दळ असलेल्या खडकपाडा परिसरात आग लागल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर परिसरातील अन्य दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी पडू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित पोस्ट

विरार-अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका प्रकल्पाची उभारणी”बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा” तत्त्वावर

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची पोलिस पाटील भरती परीक्षा केंद्रास भेट• 24 परिक्षा केंद्रावर 7843 परिक्षार्थींनी दिली पोलिस पाटील भरतीची परीक्षा..

vishwatmaklokswamivarta

कोकण, मुंबई महानगर प्रदेश, आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरात १८-१९ ऑगस्ट रोजी मुसळधार पावसाचा अंदाज नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

तंबाखुमुक्ती जनजागृती बाईक रॅलीस प्रतिसाद

इंडियन ऑईल’च्या सीएसआर उपक्रमातून कूपर रुग्णालयास बायोकेमिस्ट्री ब्लड अ‍ॅनालायझर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सेवा पंधरवड्यात भटके, विमुक्तांना लाभाचे वाटप