vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विकसीत भारत यंग लिडर्स डॉयलॉग अंतर्गत क्वीज व निबंध लेखन स्पर्धा.. 

विकसीत भारत यंग लिडर्स डॉयलॉग अंतर्गत क्वीज व निबंध लेखन स्पर्धा..

 

गडचिरोली प्रतिनिधी

युवकांचा सर्वागिण विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढिस लागणे यासाठी प्रतिवर्षी 15 ते 29 या वयोगटातील युवांचा राष्ट्रीय युवा महोत्सव युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय भारत सरकार यांचेद्वारा आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या वर्षातील राष्ट्र्रीय युवा महोत्सवाचे आयोजन दि. 12 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे करण्यात येणार आहे. उपरोक्त राष्ट्रीय युवा महोत्सवात जिल्हा-विभाग-राज्य या पद्धतीने कलाकारांची निवड होऊन राज्याचा एक संघ राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेत असतो. त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन दि.30/11/2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, क्रीडा व सांस्कृतीक भवन, कॉम्प्लेक्स, गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आला होता. सदर युवा महोत्सवाचा एक भाग म्हणुन ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय युवा महोत्सव – विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dialogue) अंतर्गत युवांच्या भारत निर्माणासाठी नवीन संकल्पना विचारात घेवून युवांना राष्ट्र निर्माणमध्ये सहभागी करुन त्यांची दूरदृष्टीता विचारात घेणे आवश्यक आहे या अनुषंगाने राष्ट्रीय युवा महोत्सव अंतर्गत "विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग" अंतर्गत खालील प्रमाणे संकल्पनेवर आधारीत ऑनलाईनपद्धतीने स्पर्धा आयोजीत करण्यात येणार आहेत.मध्ये सहभागासाठी खालील प्रमाणे टप्पे निश्चित केलेले आहेत.प्रथम टप्पा – Viksit Bharat Quiz मध्ये वैयक्तिक रित्या युवांना सहभागी होता येईल. यासाठी प्रश्न मंजुषा स्पर्धा ही सामान्यज्ञान व भारताची कामगिरी या बाबींवर होणार आहे. माय भारत पोर्टलवर शैक्षणिक संस्था व कॉलेज यांनी सहभाग नोंदवावा. सदर स्पर्धा दि. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2024 या कालावधित होणार होती परंतू या कालावधीची दि. 10/12/2024 रोजी पर्यंत वाढ देण्यात आलेली आहे. यामध्ये सहभागी होणाऱ्या युवांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

द्वितीय टप्पा – विकसित भारत यावर निबंध लेखन स्पर्धा घेतली जाईल यामध्ये शब्द मर्यादा 1000 शब्दाची राहील. प्रथम टप्यात सहभागी होवून निवड झालेल्या युवांचा यामध्ये सहभाग राहील वर नमुद केलेले 1 ते 10 या विषयावर निबंध लेखन करता येईल. यामधील सहभागासाठी प्रमाणपत्र देण्यात येईल. निबंध स्पर्धा ऑन लाईन पद्धतीने दि.08 ते 15 डिसेंबर, 2024 या कालावधीत होणार आहे.तृतीय टप्पा – Viksit Bharat PPT Challenge – वर नमुद केलेल्या विषयांवर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक राज्यातून 4 युवांची निवड करण्यात येणार आहे. निबंध माय भारत पोर्टलवर अपलोड करावयाचे आहेत. दि.20 ते 26 डिसेंबर 2024 या कालावधित सदर स्पर्धा होणार आहेत.

चतुर्थ टप्पा – राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी निवड झालेल्या युवांना प्रथम दि. 11 जानेवारी 2024 रोजी सादरीकरण करावे लागेल यामधून अंतिम फेरी यासाठी निवड झालेल्या युवांना भारत देशाचे मा. पंतप्रधान महोदय यांचे समोर संकल्पनांचे सादरीकरण करावयाचे आहे. दि. 12 जानेवारी 2025 रोजी सदर सादीरकरण होणार आहे. तरी युवा महोत्सव व विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग (Viksit Bharat Young Leaders Dilogue) अंतर्गत उपरोक्त स्पर्धांमध्ये आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त (15 ते 29 वयोगटातील) युवक-युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केले आहे.000

संबंधित पोस्ट

पर्यावरण वारी’तून विठ्ठल भक्तांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश गावोगावी घेऊन जावा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘पर्यावरणाची वारी, पंढरीच्या दारी’ या उपक्रमाचा समारोप

मिरवणूकांच्या अनुषंगाने सांगली पोलीस दल सतर्क जिल्ह्यात चोख पोलीस बंदोबस्त तैनात..

vishwatmaklokswamivarta

जालना जिल्ह्यातील बदनापूर कृषी संशोधन केंद्रास सर्व अर्थसहाय्य- कृषी मंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

जालना गणेश फेस्टीवलमध्ये मान्यवरांच्या हस्ते सभा मंडप पूजन-अशोकराव आगलावे

थंडीपासून बचावासाठी उपाययोजना;आपत्तीव्यवस्थापन प्राधिकरणामार्फत सुचना जारी

vishwatmaklokswamivarta

अतिवृष्टीग्रस्त मदतीचे जिल्ह्यात ६७ कोटी ४३ लक्ष रुपयांचे वाटप

vishwatmaklokswamivarta