vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्याचा इतिहास युवा पिढीला प्रेरणादायी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन…

 

मुंबई, प्रतिनिधी: भारतीय सैनिक सीमेवर अतुलनीय शौर्य गाजवीत असतात. त्यांच्या शौर्याचा इतिहास शब्दबद्ध करून ठेवणे आवश्यक असून युवा पिढीला तो प्रेरणादायी असल्याचा विश्वास राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केला.

कारगिल युद्धातील शौर्याबद्दल तरुण वयात परमवीरचक्र पदक मिळविलेल्या कॅप्टन योगेंद्र सिंग यादव यांच्या या गौरवाच्या 25व्या वर्षपूर्तीनिमित्त राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विनायक दळवी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी कारगिल युद्धाच्या प्रसंगी आपण संसद सदस्य असल्याचे सांगत प्रधानमंत्री श्री. वाजपेयी यांना भारतीय सैनिकांच्या अतुलनीय शौर्यावर संपूर्ण विश्वास होता याची आठवण सांगितली. कॅप्टन यादव यांनी ग्रेनेडियर म्हणून बजावलेल्या पराक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले. जीवनात शिस्त असल्याशिवाय यश मिळत नाही. ‘एनसीसी’ पासूनच तरुण वयात शिस्तीचे धडे शिकायला मिळतात. यामुळेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील ‘एनसीसी’च्या बळकटीकरणावर भर दिला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कॅप्टन यादव यांनी यावेळी कारगिल युद्धप्रसंगाचा घटनाक्रम सांगून उपस्थितांच्या डोळ्यासमोर भारतीय सैनिकांच्या पराक्रमाचे चित्र उभे केले. कॅप्टन यादव यांच्या लग्नाचा देखील २५ वा वाढदिवस असल्याने राज्यपालांच्या हस्ते त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर महिला अधिकाऱ्यांच्या हस्ते कॅप्टन योगेंद्र सिंह यादव यांच्या पत्नी श्रीमती रीना यादव यांचा यावेळी महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे ओटी भरून विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी विनायक दळवी चॅरिटेबल फाउंडेशनच्या आश्रयदाता डॉ. अश्विनी भिडे यांचा संदेश वाचून दाखविण्यात आला.

संबंधित पोस्ट

मुंबई महानगर पालिकेचे घरोघरी क्षय सर्वेक्षण,कोरोनासह ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका कायम असताना पालिकेने इतर गंभीर आजारांवरही लक्ष केंद्रित 

vishwatmaklokswamivarta

हैदराबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!माहितीपटाचे 17 सप्टेंबरला समाजमाध्यमांवरून प्रसारण

vishwatmaklokswamivarta

एक राज्य एक गणवेश’ योजनेची यंदापासून होणार अंमलबजावणी; मंत्री दीपक केसरकर यांची माहिती

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी; तर मुंबई आणि पालघर जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !रामराज्याच्या स्थापनेसाठी हिंदूंनी मारुतीरायांप्रमाणे भक्ती अन् शौर्य वाढवणे आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

श्री तुळजाभवानीदेवी मंदिरातील ८ कोटी ४५ लाख रुपयांच्या ‘दानपेटी घोटाळ्या’चे प्रकरण!न्यायालयाने आदेश देऊनही तात्काळ गुन्हे दाखल न केल्यास अवमान याचिका दाखल करणार !

नगरपरिषद, नगरपंचायत शाळांतील शिक्षक – कर्मचारी पेन्शन योजनेपासून वंचित आमदार सुधाकर अडबाले यांचा विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सवाल एक ते दीड महिन्यात सकारात्मक निर्णय : मंत्री उदय सामंत यांचे आश्वासन..