क्रीडा सप्ताहानिमित्त क्रीडा स्पर्धा व उपक्रमाचे आयोजन
जालना, प्रतिनिधी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जालना जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने व जालना जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयाच्या संयुक्त़ विद्यमाने दि. 12 ते 18 डिसेंबर 2024 या कालावधीत क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
क्रीडा सप्ताहात विविध खेळांचे प्रदर्शनिय सामने, रोल स्केटींग स्पर्धा, भारतीय पारंपरिक व्यायाम प्रकाराचे प्रदर्शन, चालणे स्पर्धा, फुटबॉल तसेच क्रीडा क्षेत्रातील नामवंत खेळाडूच्या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्याशी संपर्क साधावा, असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.-*-*-*-*-