vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 

         राज्य प्रतिनिधी  जालना,- जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

 संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 20 डिसेंबर 2024 रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात विदर्भ व मराठवाडा दुग्ध विकास-प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू पशुपालकांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सैनिकी सेवापुर्व शिक्षण संस्थेत शारिरीक प्रशिक्षण निदेशकाची आवश्यकता

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याची ओळख निर्माण करणारे ब्रँड उत्पादन उमेदअंतर्गत तयार करावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील – नाविन्यपूर्ण संकल्पनांसाठी जिल्हा परिषद यंत्रणेचे भरभरून कौतुक…

पाणी टंचाई निवारणार्थ मेहकर तालुक्यातील चार गावांसाठी टँकर मंजूर

राज्यपाल केंद्र सरकारचे एजेंट असतात. पण, राज्यपाल राज्याच्या अधिकारांवर कॅबिनेटवर अतिक्रमण, संजय राऊत शिवसेना नेते.

जिल्हा परिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना देखभाल दुरूस्ती योजनेतील रखडलेले वेतन तात्काळ द्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची उदासीनता; कर्मचार्‍यांच्या आर्थिक अडचणीत वाढ

vishwatmaklokswamivarta