vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात“अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात“अल्पसंख्याक हक्क दिवस” उत्साहात साजरा

 

ठाणे, प्रतिनिधी:- संयुक्त राष्ट्राने दि.18 डिसेंबर 1992 रोजी राष्ट्रीय, वांशिक, धार्मिक आणि भाषिक अल्पसंख्याकांच्या हक्कांचा जाहीरनामा स्विकृत करुन प्रस्तुत केला आहे. त्यानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

अल्पसंख्याक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादींचे संवर्धन करता यावे तसेच या बाबतच्या वैशिष्ट्यांची प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी, यादृष्टीने प्रयत्न करण्याबाबत राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सूचनेनूसार या दिवसाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी तथा जिल्हा अल्पसंख्याक अधिकारी श्री.वैभव कुलकर्णी यांनी अल्पसंख्याक हक्क दिनाचे महत्व समजावून सांगितले.

या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्री.भरत साळुंखे, मानव विकास विभागाचे अधिकारी श्रीमती दिपाली भोये, लेखा अधिकारी श्रीमती स्मिता नि. पट्टेकर, अल्पसंख्याक कक्षातील सांख्यिकी सहायक श्री. सुनिल नाडेकर, महसूल सहायक श्रीमती शितल जाधव व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते

संबंधित पोस्ट

मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाणे शहरातील शाळांमध्ये चुनाव पाठशाळांचे आयोजन

वांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्दवांद्रे येथील सदनिकांच्या चाव्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना सुपूर्द

महिला व बाल विकास कार्यालयाकडून तयार केलेल्यानारीबलम पुस्तिकेचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याहस्ते प्रकाशन

vishwatmaklokswamivarta

मुंबई शहरातील १० हजारांहून अधिक मतदार असलेल्या मतदान केंद्रावर विविध रंग संकेतन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांची माहिती

vishwatmaklokswamivarta

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर कार्यक्रमाचे आयोजन-नागरिक, शेतकरी, विद्यार्थ्यांनी शिबिराचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

नववर्ष प्रण – सुरक्षित अन्न’ विशेष तपासणी मोहीम सुरू