vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्यप्रदेश

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना

आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनविण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा-केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना…

 

राज्य प्रतिनिधी -गोरगरीब जनतेला केंद्रबिंदू मानून प्रत्येक व्यक्तीला उत्तमातील उत्तम आरोग्य सेवा मिळावी या दृष्टीकोनातून आरोग्य सेवा सुलभ आणि सक्षम बनविण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना केंद्रीय आयुष (स्वतंत्र प्रभार) आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अर्थसंकल्पासंदर्भात 18 डिसेंबर रोजी दिल्ली येथील आरोग्य मंत्रालयाच्या दालनात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री श्री. जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना केंद्रीय राज्यमंत्री श्री. जाधव पुढे म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकांना उत्तमातील उत्तम आरोग्यसेवा देण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध आहे. त्या दृष्टिकोनातून येणाऱ्या अर्थसंकल्पात आरोग्यसेवा अधिक सक्षम करून नागरिकांना सहज आरोग्य सुविधा मिळण्याच्या दृष्टिकोनातून उपाय योजना करा, अशी सूचना केली. सोबत आरोग्य विषय विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला आरोग्य विभागाची वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

समुद्र से समृद्धी उपक्रमांतर्गत सागरी व ऊर्जा प्रकल्पांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

vishwatmaklokswamivarta

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासकीय मंडळनियुक्तीला हायकोर्टात आव्हान; 23 एप्रिल रोजी सुनावनी..

यंदाच्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रात 8 लाख हेक्टर जमिनीवरील पिकांचे नुकसान..

हिंदू समाजाच्या व्यापाऱ्यांच्या दुकानावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा भव्य विराट मूक मोर्चा.. ..

vishwatmaklokswamivarta

डिफेन्स क्लस्टर तयार करून उद्योजकांच्या क्षमतांना चालना द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संरक्षण सामुग्री उत्पादनांसाठी आत्मनिर्भरतेकडे देशाची वाटचाल -संरक्षण मंत्री राजनाथ सिंह- छत्रपती संभाजीनगरच्या उद्योजकांना संरक्षण मंत्र्यांचे निमंत्रण…

बुलढाणा जिल्हा कारागृहात ‘जिवन गाणे गातच जावे’ सांस्कृतिक कार्यक्रम; बंद्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद