vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी पाण्याची मागणी नोंदवा…

रब्बी हंगाम आवर्तन नियोजनासाठी पाण्याची मागणी नोंदवा…

सांगली, प्रतिनिधी) : टेंभू उपसा सिंचन प्रकल्प व्यवस्थापन विभाग, ओगलेवाडी अंतर्गत सन 2024-25 मध्ये रब्बी हंगाम आवर्तन पाणी सोडण्याचे नियोजन प्रस्तावित आहे. टेंभू उपसा सिंचन योजना व कृष्णा कालवा तसेच कृष्णा प्रकल्प (आरफळ कालवा) या प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील सर्व पाणीवापर संस्था, विविध पाणीपुरवठा योजना, ग्रामपंचायत व प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना तसेच सर्व बिगरसिंचन ग्राहक आणि वैयक्तिक लाभधारक यांनी टेंभू प्रकल्प व कृष्णा कालवा आणि कृष्णा प्रकल्प (आरफळ कालवा) प्रकल्पाच्या रब्बी हंगाम सन 2024-25 करिता पाण्याची मागणी लेखी नोंदवावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता रा. य. रेड्डीयार यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

    लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील नमुना नं. ७, ७अ व ७ब चे पाणी मागणी अर्ज सर्व तऱ्हेने पूर्ण करून संबंधित उपविभाग तसेच शाखा कार्यालयात तात्काळ भरून दाखल करावेत. विहित नमुन्यातील पाणी मागणी अर्ज व लेखी पाणी मागणी नोंदविल्यानंतर रब्बी हंगाम आवर्तन पाण्याचे नियोजन करण्यात येईल. नमुना नं ७, ७अ व ७ब चे पाणी अर्जाप्रमाणे मागणी प्राप्त न झाल्यास कोणतेही म्हणणे ग्राह्य धरले जाणार नाही. क्षेत्रीय स्तरावर पाण्याचे नियोजन करण्यात येऊन पाणीपट्टीची रक्कम लाभक्षेत्रातील ऊस कारखान्यांमार्फत कपात करून घेण्यात येईल याची नोंद घ्यावी. तसेच मागील थकबाकी व चालू रब्बी हंगामामधील मागणीप्रमाणे पाणीपट्टी भरून प्रशासनास सहकार्य करावे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.00000

संबंधित पोस्ट

शांतता समिती बैठकखुलताबादची सामाजिक एकोप्याची परंपरा कायम राखू-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांना नवीन बाजारपेठांचा लाभासाठी शुक्रवारी उत्पादक खरेदीदार संमेलन- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

बार्टीच्या त्या ७६३ विद्यार्थ्यांना संपूर्ण अधिछात्रवृत्ती

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,तीन दिवसीय विदर्भ पाणी परिषदेस प्रारंभ   बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्रतापी पुनर्भरण व वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्प देईल शेतीला शाश्वत पाणी..

पत्रकारांसाठी कार्यशाळा तज्ज्ञांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्र आणि शुद्धलेखनाचे मंत्र..

ग्रामीण महाराष्ट्राच्या पर्यटन‍ विकासाला मिळेल चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास

vishwatmaklokswamivarta