मुंबई- कलेचे वेड फार अजब आहे . त्या कलेने ती व्यक्ती पूर्ण भारावून गेलेली असते . स्वतःला कलेप्रती वाहून जाते . एवढं कलेचे प्रेम त्या व्यक्तीला भारावून टाकते असेच कलेने भारावलेल्या , आत्मभान हरपून गेलेल्या कलाप्रेमीचे नाव म्हणजे डॉ. संतोष चंद्रकांत कटारे होय. ज्या कलाप्रेमीने आपल्या स्वतःच्या रक्ताने अनेक महापुरुषांच्या पेंटींग काढून एक आगळावेगळा ठसा उमटविला आहे . ज्यामुळे त्यांची ओळख ब्लड आर्टिस्ट म्हणून होते आहे. त्यामुळेच त्यांना दुबई येथे डॉक्टरेट पदवी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे .
फ्रान्समधून त्यांना पीएचडी देण्यात आली आहे . दिल्ली येथे नेल्सन मंडेला यांच्या नावाने सन्मानित करण्यात आले आहे . आणि नाशिक येथे छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्काराने आले आहे . एवढेच नव्हे तर दुबई येथील संस्थेनेही त्यांच्या कलेची दखल घेत त्यांना ब्लड आर्टिस्ट म्हणून गोरविण्यात आले आहे . असा हा हुन्नरी कलावंत महापुरुषांच्या , महामानवाच्या विचारांनी , त्यांच्या त्यागांनी, समर्पणपणाने भान हरपून गेला आहे त्यामुळे आपण त्यांचे काही तरी देणे लागतो. आपण समाजाला , तरुणांना काही संदेश देऊ शकतो कि, आपण समाजाचे काहीतरी देणेकरी आहोत आणि हीच भावना मनाशी पक्के करून त्यांनी आपल्या रक्ताने येशू ख्रिस्त , अल्लाह, राष्ट्रीय गीत, भगतसिंग, अण्णाभाऊ साठे, शिवाजी महाराज, गुरु गोविंद सिंग, शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटले आहे
या चित्रकाराने आपल्या रक्ताने रंगावलेल्या जवळपास ६० चित्रे आहेत. त्यात लोकनेते रामदास आठवले , बाळासाहेब आंबेडकर , अजित पवार यांच्या सह अनेक नेतेमंडळीची चित्रे आहेत . सध्या त्यांनी सिनेकलावंत सलमान खान यांचं आपल्या रक्ताने चित्र काढून त्यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ त्यांना आगळावेगळी भेटीचा नजराणा बहाल केला आहे . अशी त्यांना १०० चित्रे रेखाटून सुंदर असे भव्य चित्रप्रदर्शन भरावयाचे आहे. आणि हे चित्र त्यांचा मित्र जो दोन वर्ष इहलोकी सोडून गेलेल्या सचिन उर्फ बाळा मोरे यांच्या आठवणीने प्रेरणेने साकार झाले आहे. कारण त्यांची ती इच्छा होती आणि ती इच्छा पूर्ण करण्यासाठी सिनेकलावंत अरबाज खान यांच्या हस्ते वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे आयोजित केलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यावेळेस त्यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. ती इच्छा त्या निमित्ताने पूर्ण झाली असून ते चित्र दानशूर अशा सिनेकानाकार सलमान खान यांना दयावयाची मोठी आस आहे. ती आस पूर्ण होवो यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्यांच्या अशा आगळ्या वेगळ्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे नातेवाईक
रोकडे मामा ,पराग राजपूत, रिपाई (आठवले ) गटाचे कोकण प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर कदम, दादासाहेब जाधव आदिनी अथक परिश्रम घेतले आहे.एक चित्र काढण्यासाठी जवळजवळ ३५० मिली रक्त लागते. असे त्यांनी ६० चित्रे रेखाटून गेली १५ वर्षे ही तपश्चर्या अखंड तेवत ठेवली आहे . आणि ही सेवा अशीच सुरु राहणार असल्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. एवढ्यावरच ते थांबत नाही तर त्यांनी हजारो तरुणांना रोजगार देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे . अशा या चित्रकाराची सर्व मनसुबे पूर्ण होवो हीच त्यांना शुभेच्छा !!!