vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

कराटे योद्धा असोसिएशनची ५व्या मास्टर रॉयल कप नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी – ६ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य पदकांची लयलूट !

कराटे योद्धा असोसिएशनची ५व्या मास्टर रॉयल कप नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक कामगिरी – ६ सुवर्ण, ८ रौप्य, ९ कांस्य पदकांची लयलूट !

खेळ प्रतिनिधी-

मुंबई: अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, अंधेरी (प.) येथे २८ आणि २९ डिसेंबर २०२४ रोजी पार पडलेल्या ५व्या मास्टर रॉयल कप नॅशनल कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये कराटे योद्धा असोसिएशनच्या खेळाडूंनी अभूतपूर्व कामगिरी करत एकूण २३ पदकांची कमाई केली. या यशस्वी कामगिरीमुळे असोसिएशनने राष्ट्रीय पातळीवर आपली ताकद सिद्ध केली आहे.

खेळाडूंच्या यशाचा आढावा:

अनादिका स्वामी – सुवर्ण (कुमिते), रौप्य (काता)

दिपांशु गुप्ता – सुवर्ण (कुमिते), सुवर्ण (काता)

कृषिका जायसवाल – सुवर्ण (कुमिते), कांस्य (काता)

वेदार्थ स्वामी – सुवर्ण (काता), कांस्य (कुमिते)

भावेश – कांस्य (काता)

सिद्धांत भांडारी – कांस्य (कुमिते)

शब्बन इद्रिसी – रौप्य (कुमिते), रौप्य (काता)

श्रवणी सुरवसे – सुवर्ण (काता), कांस्य (कुमिते)

इशाक मिया – रौप्य (काता), कांस्य (कुमिते)

कनिष्का – कांस्य (कुमिते)

संग्राम सुरवसे – कांस्य (कुमिते), कांस्य (काता)

यश सरोज – रौप्य (काता)

वेदांत शिंदे – रौप्य (कुमिते)

आराध्या कोरी – रौप्य (काता), रौप्य (कुमिते)

आर्मान इद्रिसी – कांस्य (काता)

या स्पर्धेत असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश सिंग यांची विशेष उपस्थिती लाभली. त्याचप्रमाणे वरिष्ठ महिला प्रशिक्षक नझरीन खान मॅडम आणि ऋतुजा घेवाडे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

कराटे योद्धा असोसिएशनने धारावीपासून अख्ख्या भारतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे असे आयोजकांनी अभिमानाने सांगितले.

संबंधित पोस्ट

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नवी मुंबई महानगरपालिका सज्ज…

vishwatmaklokswamivarta

भूजल स्त्रोत नकाशांकनाविषयीजिल्हाधिकारी कार्यालयात कार्यशाळेद्वारे मार्गदर्शन

vishwatmaklokswamivarta

मतदार यादीतील घोळांचे प्रदर्शन: नवी मुंबईत मनसेचा निवडणूक आयोगावर थेट प्रहार!

vishwatmaklokswamivarta

कोल्हापूर जिल्ह्यातील वारणानगर येथील वारणा विद्यापीठास समुह विद्यापीठाचा दर्जा देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

उत्तराखंड 🌧️: रुद्रप्रयाग, चमोली आणि बागेश्वर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे ५ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर ११ जण अद्याप बेपत्ता जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापन संघ बचाव व मदत कार्यात व्यस्त आहेत.पाऊस आणि भूस्खलनामुळे या जिल्ह्यांमध्ये दैनंदिन जीवन गंभीरपणे प्रभावित…

नवी मुंबईतील तळोजा येथील उदबत्ती बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग; जीवितहानी नाही मात्र लाखोंचा माल जळून खाक…

vishwatmaklokswamivarta