vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

अमेरिकेत विविध ठिकाणी घातपाताच्या दुर्दैवी घटना- न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, सायबर ट्रकचा स्फोट ,न्यू ऑर्लिन्समध्ये भरधाव ट्रक अनेकांना चिरडले जमैका परिसरात गोळीबार…

अमेरिकेत विविध ठिकाणी घातपाताच्या दुर्दैवी घटना- न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, सायबर ट्रकचा स्फोट ,न्यू ऑर्लिन्समध्ये भरधाव ट्रक अनेकांना चिरडले जमैका परिसरात गोळीबार…

 

विदेश प्रतिनिधी-

अमेरिकेत विविध ठिकाणी घातपाताच्या दुर्दैवी घटना- न्यूयॉर्कमधील नाईट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार, सायबर ट्रकचा स्फोट ,न्यू ऑर्लिन्समध्ये भरधाव ट्रक अनेकांना चिरडले जमैका परिसरात गोळीबार…अमेरिकेत पुन्हा एकदा हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमधील एका नाइट क्लबमध्ये अंदाधूंद गोळीबार झाल्याचे समोर आले आहे. या भीषण हल्ल्यात 11 जण गोळीबारात जखमी झाले आहेत. ही घटना न्यूयॉर्कच्या क्वीन्स शहरातील अमाचूरी नाइट क्लबमध्ये झाली आहे.

न्यू ऑर्लिन्समध्ये भरधाव ट्रक जमावात घुसला आणि त्याने अनेकांना चिरडले होते. ज्यामध्ये 15 जण जखमी झाले होते. या घटनेच्या काही तासांनंतरच लास वेगासमध्ये ट्रम्प इंटरनॅशनल हॉटेलच्या बरोबर बाहेर टेस्लाच्या सायबर ट्रकचा मोठा स्फोट झाला होता.

याशिवाय जमैकामधील अमाजुरा इव्हेंट हॉलजवळ 1 जानेवारी रोजी रात्री 11.45 वाजता गोळीबाराची घटना घडली होती. ज्यामध्ये प्राप्त माहितीनुसार किमान तीनजण गंभीर जखमी झाले होते आणि यासर्व घटनानंतर 24 तासांच्या आतच ही चौथी घटना घडल्याने अमेरिका हादरली आहे.

 घटनेनंतर न्यूयॉर्क पोलीस विभागातील अनेक यूनिट्स घटनास्थळी पोहचले आणि तपास सुरू केला. सोशल मीडियावर व्हायरल या घटनेच्या व्हिडिओत मोठ्याप्रमाणात पोलीस आणि रुग्णवाहिका नाइट क्लबच्या बाहेर बघू शकतो. खरंतर आतापर्यंत न्यूयॉर्क पोलिस विभागाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. हा नाइट क्लब शहरातील नावाजलेला स्पॉट मानला जातो.

न्यूयॉर्क सिटी फायर डिपार्टमेंट आणि अन्य स्थानिक यंत्रणांचे एक पथक घटनास्थळी पोहचून पीडितांची मदत करत आहे. याशिवाय पोलिस आसापासच्या घरांध्ये जावून तपसणी करत आहे आणि घटनेबाबत अधिक माहिती जोडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहे.

संबंधित पोस्ट

बलुचिस्तानमधील स्वातंत्र्य चळवळीच्या पार्श्वभूमीवर आता वझिरिस्तानमध्येही स्वतंत्र राष्ट्रासाठी आंदोलन सुरू

व्हिएतनाम राष्ट्राध्यक्षांचे राज्यपाल, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत; मुंबई शहर व्हिएतनाम करिता पर्यटनाचे ‘गेट वे’ झाले असल्याची राष्ट्राध्यक्षांची भावना*  

बांगलादेशमध्ये महिला आणि मुलांवरील वाढत्या हिंसाचाराच्या घटनांबाबत युनिसेफने ने तीव्र चिंता व्यक्त केली आहे आणि संरक्षण यंत्रणा मजबूत करण्यासाठी तसेच दोषींना शिक्षा होण्याची हमी देण्यासाठी तातडीने कारवाई करण्याचे आवाहन केले

फिनलँडचे राष्ट्रापती अलेक्झांडर स्टब यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी नवी दिल्लीत आगमन. 

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर  व्यावसायिक संबंध अधिक दृढ- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल-महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

थायलंडच्या फुकेतमध्ये मराठी संस्कृतीची छाप; पर्यटनासोबत रिअल इस्टेट गुंतवणुकीची नवी दिशा!फुकेतमधील ‘दगडूशेट गणपती’ मंदिर जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र!