vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू

बालमहोत्सवातून मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना- मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे-तीनदिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव दिमाखात सुरू

 

सांगली, प्रतिनिधी-

चाचा नेहरू बालमहोत्सवात बालकांनी सादर केलेल्या कार्यक्रमातून आपणाला ऊर्जा मिळाली. या बालमहोत्सवाचा मुलांनीही आनंद घ्यावा. जीवनात कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावरील हास्य कायम ठेवावे व आनंदाने जगावे. या महोत्सवामुळे मुला – मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल. तसेच, त्यांच्यामध्ये जीवनातील संघर्षाला सामोरे जाण्याची शक्ती निर्माण होईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज येथे केले.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, सांगली यांचेमार्फत शासकीय / स्वयंसेवी संस्था व शाळांमधील बालकांसाठी आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव सन २०२४-२५ च्या उद्‌घाटक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी पोलिस उपअधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा परिषद जिल्हा कार्यक्रम अधिकारी संदीप यादव, नागरी विकास प्रकल्प अधिकारी सुहास बुधावले, दादुकाका भिडे बालगृह संचालिका भारती दिगडे, डॉ. जयश्री पाटील, मानद कार्यवाहक सुनिल कोरे आदि उपस्थित होते.

समाजाचे एक घटक म्हणून विशेष बालकांची सामान्य बालकांप्रमाणेच विशेष काळजी घेऊन त्यांना प्रेम देत असल्याबद्दल संबंधितांचे कौतुक करून मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, समाजामध्ये दुर्देवी घटनांमुळे एकाकी पडलेल्या बालकांना संघर्ष करावा लागतो. मात्र जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय तसेच स्वयंसेवी संस्थांकडून अशा बालकांना आधार दिला जातो हे वाखाणण्याजोगे आहे. त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, स्वावलंबी बनविण्यासाठी आपण प्रयत्न करत आहात, असे त्या म्हणाल्या.

जिल्हा परिविक्षा व अनुरक्षण संघटना संचलित कै. दादू काका भिडे मुलांचे निरिक्षण/बालगृह व सौ. सुंदरबाई मालु मुलींचे निरीक्षण गृह/बालगृह, सांगली या ठिकाणी हा बालमहोत्सव ०८ जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील बाल कल्याण क्षेत्रात कार्यरत असलेल्या शासकीय/ स्वयंसेवी संस्थामध्ये पुनर्वसनासाठी दाखल झालेल्या अनाथ, निराधार मुलांच्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्यात एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण करण्यासाठी बाल मेळावा, क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम अशा तीन दिवसीय जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी बाल कल्याण समितीचे अध्यक्ष व बाल न्याय मंडळाचे सदस्य, संस्था अधीक्षक, कर्मचारी, कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी, तालुका संरक्षण अधिकारी, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा चाईल्ड लाईन यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रारंभी संस्थेतील बालिकांनी मान्यवरांचे औक्षण करून स्वागत केले. तसेच बालगृहातील बालकांनी संचलनाद्वारे मान्यवरांच्या उपस्थितीची शोभा वाढवली, गणित प्रदर्शन व वाचन क‌ट्ट्याच्या उद्घाटनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

जगदगुरू संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन दिनाचे औचित्य साधून श्री क्षेत्र देहू देवस्थान समितीच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ‘जगदगुरू तुकाराम महाराज पुरस्कार’  

आज बुधवार, २८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी बारामती येथे झालेल्या एका भीषण विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाल्याची धक्कादायक बातमी…

vishwatmaklokswamivarta

बारामती येथे शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य क्षेत्रातील विविध महत्त्वाकांक्षी उपक्रमांचा शुभारंभ गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेला राज्यशासनाच्यावतीने गती-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

सातारा-लातूर व सातारा-पंढरपूर महामार्गाची अर्धवट कामे प्राधान्याने पूर्ण करा     – ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न

मागेल त्याला सौर कृषि पंप योजनेच्या निकषात बदल करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ऊर्जा मंत्रालयाने निश्चित केलेल्या मानांकनामध्ये महावितरणने देशात प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन..     

vishwatmaklokswamivarta