vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ

बेटी बचाओ बेटी पढाओ’ राज्यस्तरीय अभियानाचा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते शुभारंभ…

 

राज्य प्रतिनिधी-

केंद्र शासनाने ‘बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ’ हे महत्वाकांक्षी अभियान सुरू केले आहे.  सन 2021-22 पासून राज्यातील  सर्व  जिल्हयांमध्ये  हे अभियान राबविण्यात येत आहे.  या राज्यस्तरीय अभियाचा शुभारंभ आणि दशकपूर्ती सोहळा महिला व बालविकास मंत्री   अदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मंत्रालयात करण्यात आला.

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ‘बेटी बचाओ बेटी पढाओ ‘ हे अभियान सुरू झाले. या उपक्रमामुळे मागील दहा वर्षात मुलींचा जन्मदर वाढला आहे. मुलींच्या प्राथमिक शिक्षणाचा टक्का हा ८७ टक्क्यांवरून ९५ टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

अभियानाच्या माध्यमातून मुलगा – मुलगी भेदभाव करू नये. मुलींना शिकवल्यास त्या कुटुंबाचा आधार होतात. या शिकवणीसह घरातील मुलांना मुलींप्रती चांगली शिकवण, संस्कार देणे गरजेचे आहे. मुलींमध्ये कर्तृत्ववान स्त्री असल्याचा आत्मविश्वास निर्माण करा. असे सांगून हे अभियान दि. 22 जानेवारी ते 8 मार्च 2025 या कालावधीत विशेष उपक्रमाच्या माध्यमातून राज्यात राबविण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी यावेळी सांगितले.

महिला व बालविकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांचा आत्मसन्मान वाढवणाऱ्या अनेक योजना आणल्या. या योजनांमुळे महिला स्वावलंबी झाल्या.

राज्य शासनाने मुलींना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे महिलांचे उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढण्यास मदत होईल. महिला लखपती दीदी झाल्या पाहिजे. आपला महाराष्ट्र हा जिजाऊ, सावित्री बाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचा आहे असे सांगून मुलींचा जन्मदर आणि शिक्षण यासाठी समाजप्रबोधनाचे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावेत त्यामुळे लोकांचे मनपरिवर्तन होण्यास मदत होईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट

सणासुदीच्या काळातही विजाभज आश्रमशाळा कर्मचारी वेतनापासून वंचित आश्रमशाळा वेतनासाठी तरतूद द्या – आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रधान सचिवांना निवेदन..

केंद्र पुरस्कृत शासकीय योजनांचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींना द्यावा- खासदार विशाल पाटील- दिशा समितीच्या बैठकीत केंद्र पुरस्कृत योजनांचा आढावा

दिवाळीत प्रवास महागणार – राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे तिकीट दरात वाढ

इराण-इराक मधील संभाव्य युद्धजन्य परिस्थितीनुषंगाने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन-जिल्हा प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी तत्पर  – जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ

मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित,जात पडताळणीची १६ हजार ११० प्रकरणे निकाली ; एसईबीसीची २ लाख ९५ हजार ३०५ प्रमाणपत्रे वितरित

vishwatmaklokswamivarta

वाघिणीला नव्हे तर तिच्या शावकाला परतवाडा येथे हलविले; वन विभागाचे स्पष्टीकरण..