vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आज भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा-माहीम माटुंगा विभागात आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रणाली  राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण…

आज भारताचा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा-माहीम माटुंगा विभागात आम आदमी पक्षाच्या नेत्या प्रणाली  राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण…

मुंबई प्रतिनिधी –

मुंबईतील माहीम माटुंगा विभागात असलेल्या भागोजी कीर मार्गावरील विभागातील नागरिकांनी रहिवाशांनी तसेच समाजसेविका आम आदमी पार्टीच्या मुंबई समिती च्या नेत्या प्रणाली गिरीश राऊत यांच्या हस्ते परिसरात ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी मोठ्या संख्येने परिसरातील नागरिक आणि रहिवासी उपस्थित होते,नागरिकांनी ताडेश्वर सोसायटीजवळ झेंडावंदन केले. नवतरूण बालमित्र मंडळातर्फे हा कार्यक्रम झाला. प्रणाली गिरीश राऊत  हस्ते तिरंगा फडकवला गेला. याप्रसंगी राऊत म्हणाले की, भारतीयांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी केलेल्या त्यागाचे स्मरण केले. गांधीजी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग यांच्या बलिदानाने जनतेने, जनतेसाठी, जनतेतर्फे आणलेल्या लोकशाहीकडे वाटचाल झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सहकाऱ्यांनी दिलेली संविधानाची अंमलबजावणी सुरू झाली तो प्रजासत्ताक दिन. ते म्हणाले दरम्यान देशात नागरिक हा सार्वभौम आहे. तो देशाचा मालक आहे. त्याच्या इच्छेप्रमाणे, त्याच्या हितासाठी काम केले गेले पाहिजे. परंतु आज देशात उलट चित्र दिसते. आपल्या विभागातील क्रिडांगणांवर व उद्यानांवर बांधकामाच्या योजना येतात. या मोकळ्या जागा वाचवण्यासाठी आपल्याला झगडावे लागते. ‘प्रजासत्ताक’, ही संकल्पना आपल्याला समजली, तर ही वेळ येणार नाही. देशाच्या भावी पिढ्यांसाठी असलेली ही ठेव वाचवणे हे आपले कर्तव्य आहे याबद्दल मी लोकांना जाणीव करून दिली.

 

सदर ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रकांत साठे, श्री. बाळू मनसुख, श्री. यशवंत साठे आणि सहकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. *७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा.**प्रजासत्ताक चिरायू होवो.*प्रणाली गिरीश राऊत मुंबई प्रदेश समिती आम आदमी पार्टी ,चिन्ह : झाडू

 

संबंधित पोस्ट

परवानाधारकाकडील शस्त्रे पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्याचे जिल्हादंडाधिकारी डॉ. किरण पाटील यांचे निर्देश • शस्त्रे जमा करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना

vishwatmaklokswamivarta

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · उद्योगांना आणि गुंतवणूकदारांना पोषक इको सिस्टिम राज्यात उपलब्ध

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यामध्ये दि.12 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

घोडबंदर रोडचे नामकरण मराठा योद्धा शूर चिमाजी अप्पा मार्ग करा उपमहापौर कृष्णा पाटील यांची महासभेत प्रस्तावाची सूचना

स्व. यश मालवारच्या स्मृती प्रित्यर्थ वृद्धाश्रमात टिन शेड चे साहित्य भेट*

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव काळात वाहतूक नियमांविषयी जनजागृती मोहीम राबवा- जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे· रस्ते सुरक्षा समिती बैठकीत विविध विषयांवर चर्चा..