vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी

 

( सुरेश गायकवाड )मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षपदी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांचीच वर्णी लागली असल्याचे त्या संस्थेचे विश्वस्त ॲड. बी.के. बर्वे यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या केंद्रीय कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यावेळेस संस्थेचे पदाधिकारी डॉ वामन आचार्य, डॉ. यु एम मस्के, अरविंद सोनटक्के,रिपाईचे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे, रिपाईचे दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष शिरिष पवार, सरचिटणीस शिरीष चिखलकर, कुलाबा विधानसभेचे तालुका अध्यक्ष विशाल गायकवाड ,कार्यालयीन सचिव दादासाहेब जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

    यावेळेस ॲङ बर्वे यांनी सांगितले की, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षपदाला आजतागायत सरकार दरबारी, न्यायालयात कुणी ही विरोध केला नाही. कसलाही दावा दाखल केला नाही. त्यातच संस्थेच्या अध्यक्षपदी दावा करणारे रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष, नेते आनंदराज आंबेडकर यांच्याकडे कोणताही कायदेशीर पुरावा नाही. त्यामुळे त्यांनी तरी समाजामध्ये कोणताही गैरसमज पसरवू नये. याउलट समाजाच्या आणि विद्यार्थ्याच्या भवितव्याच्या दृष्टीने विधायक पाऊल उचलण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

   इतकेच नव्हे तर बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळणाऱ्या आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली विकास करणार असून राज्यात सर्व जिल्ह्यात जमीन मिळवून विविध महाविद्यालये सुरु करणार आहेत. राज्याबाहेर अन्य राज्यात जमीन मिळवून संस्थेचा विकास करणार आहेत.

  तसेच छत्रपती संभाजीनगर मध्ये मेडीकल कॉलेज सुरु करण्याचा प्रयत्न असून गरीब मुलांना पूर्व प्राथमिक शिक्षण शिक्षण इंग्रजी माध्यमांद्वारे प्रयत्न आहे. कमवा आणि शिका या तत्वावर ही विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक संकुल उभे करण्याचा त्यांचा मानस आहे.

    आजमितीस भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी ८ जुलै १९४५ रोजी दलित शोषित पिडीत विद्यार्थ्याकरिता पीपल्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली होती. या शैक्षणिक संस्थेचे मुंबई नवी मुंबई महाड औरंगाबाद नांदेड, पुणे, कोल्हापूर बंगलोर गया – बिहार याठिकाणी ४३ शाळा, महाविद्यालय आणि वस्तीगृहे आहेत. त्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा आठवले साहेब यांचा मानस असल्याचे ही त्यांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले..

vishwatmaklokswamivarta

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राहुरी विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक २०२६ जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्ष स्थापन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव; संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा सन्मान

महापारेषण’ आणि ‘महानिर्मिती’मध्ये ७६५ के.व्ही. पारेषण प्रकल्पासाठी सामंजस्य करार

vishwatmaklokswamivarta

दलित आयपीएस अधिकारी पुरण कुमार यांच्या आत्महत्येस जबाबदार अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याच्या मागणीसाठी केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली मुख्यमंत्री नायबसिंह सैनी यांची भेट… दिवंगत पुरण कुमार यांच्या कुटुंबीयांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट

vishwatmaklokswamivarta