vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसायस्थानिक बातम्या

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

ठाणे, प्रतिनिधी:- किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडील धान पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान/भरडधान्य खरेदी करण्याबाबत शासनाने शासन निर्णय क्र.खरेदी-1124/प्र.क्र.160/नापु-29, दि.14 ऑक्टोबर 2024 अन्वये मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

या शासन निर्णयातील परिच्छेद क्रमांक 3 मध्ये आधारभूत किंमती, सर्वसाधारण गुणवत्ता व दर्जा पुढीलप्रमाणे आहे.पीक- धान / भात – साधारण (एफ. ए. क्यु.) – आधारभूत किंमत रुपये – 2300/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 2300/-.

“अ” दर्जा – आधारभूत किंमत रुपये – 2320/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 2320/-.पीक- भरडधान्य – ज्वारी (संकरित) – आधारभूत किंमत रुपये – 3371/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 3371/-.ज्वारी (मालदांडी) – आधारभूत किंमत रुपये – 3421/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 3421/-.

बाजरी – आधारभूत किंमत रुपये – 2625/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 2625/-.मका – आधारभूत किंमत रुपये – 2225/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 2225/-.रागी – आधारभूत किंमत रुपये – 4290/-, शेतकऱ्यांना प्रत्यक्ष द्यावयाचा दर रुपये – 4290/-.

धान खरेदीचा कालावधी:खरीप पणन हंगाम – दि. 14 ऑक्टोबर 2024 ते दि. 31 जानेवारी 2024.रब्बी पणन हंगाम (रब्बी/उन्हाळी) केंद्र शासनाकडून प्राप्त सूचनांनुसार राहील.शासनाने धान व भरडधान्य खरेदी करण्यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन मुंबई व आदिवासी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ नाशिक या दोन अभिकर्ता संस्थांची नियुक्ती केलेली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यामध्ये बिगर आदिवासी क्षेत्रात महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिग फेडरेशन व आदिवासी विकास क्षेत्रामध्ये आदिवासी विकास महामंडळ या दोन यंत्रणा कार्यरत असून सन 2024-25 या खरीप पणन हंगामाकरिता धान (भात) खरेदी करण्यासाठी अभिकर्ता संस्थाना शेतकऱ्याकडील धान खरेदी करण्यासाठी पुढीलप्रमाणे धान खरेदी केंद्रे सुरु करण्याच्या सूचना दि.21 ऑक्टोबर 2024 व दि. 24 ऑक्टोबर 2024, दि.06 डिसेंबर 2024 तसेच दि.01 जानेवारी 2025रोजी झालेल्या जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीत दिलेल्या आहेत.अभिकर्ता संस्था – महाराष्ट्र स्टेट को. ऑप. मार्केटिंग फेडरेशन मर्या, तर्फे जिल्हा मार्केटिंग अधिकारी ठाणे.धान खरेदी केंद्राचे ठिकाण – मुरबाड तालुका – मुरबाड, भिवंडी तालुका – पडघा, दुगाड फाटा, झिडके, व कल्याण तालुका – चवरे (मामनोली)अभिकर्ता संस्था – महाराष्ट्र राज्य सह. आ.वि.महा. मर्या. तर्फे प्रादेशिक व्यवस्थापक, महा. रा.सह. आ. वि.महा, प्रादेशिक कार्यालय जव्हार, जि. पालघर.धान खरेदी केंद्राचे ठिकाण – शहापूर तालुक्यातील – चोंढे (डोळखांब संस्था), मुगांव, सावरोली, मुरबाड तालुक्यातील – धसई, माळ, पाटगांव ही मागील वर्षातील सुरु ठेवण्यात येणारी तसेच शहापूर तालुक्यात – आटगाव संस्था, सापगांव संस्था, पिवळी, भिवंडी तालुक्यात – मैंदेवरीलप्रमाणे धान खरेदी केंद्र मंजूर करण्यात आलेले असून शासनपत्र क्र. खरेदी 1124/प्र.क्र.160/ना.पु.29, दि.28 जानेवारी 2025 च्या पत्रान्वये पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे, असे ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी विकास गजरे यांनी कळविले आहे

संबंधित पोस्ट

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक -2025शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहपरिसरात मिरवणूका काढणे, घोषणा देण्यास निर्बंध…

vishwatmaklokswamivarta

आपली प्रगती कशात आहे ते शोधा आणि राष्ट्राच्या प्रवाहात जाती-जातीत वाद होणार नाही याची दक्षता घ्या : अ‍ॅड. ब्रम्हानंद चव्हाण यांचे प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

ब्राईट फ्युचर व प्राऊड संस्थेकडून बेरोजगारांना पालकांनी सह मार्गदर्शन!

केरळमधील ‘शिवोहम् टेंपल ऑफ कॉन्शियसनेस’च्या वतीने देण्यात आला पुरस्कार ,सनातन संस्थेच्या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली  गाडगीळ यांना ‘ॐ शिव शक्ति ॐ’ पुरस्कार प्रदान !

दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सच्या विमानाचे इमर्जन्सी लॅण्डिंग,विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी …

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमादरम्यान भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून काम करावे –प्रधान सचिव श्रीकर परदेशी*‘हिंद-दी-चादर’ कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज** वाहतूक, आपत्ती व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन*