vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव

वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी कालावधीत ग्रंथमहोत्सव

 

सातारा प्रतिनिधी : जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत लोकमान्य टिळक ग्रंथ संग्रहालय वाई संचिलत रमेश गरवारे सभागृह, वाई येथे 8 व 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे व मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे

 जिल्हा ग्रंथालय अधिकारी, सातारा या कार्यालयामार्फत आयोजित केलेल्या ग्रंथोत्सव-२०२४ अंतर्गत ग्रंथदिंडी, परिसंवाद, प्रकट मुलाखत, कवी संमेलन, लेखक व वाचक संवाद याबरोबरच ग्रंथोत्सवामध्ये विविध साहित्यिक कार्यक्रमांसोबतच शासकीय व बालभारती प्रकाशने, स्पर्धा परीक्षेचे ग्रंथस्टॉल आणि अन्य प्रकाशनांचे ग्रंथ प्रदर्शनासाठी व विक्रीकरिता उपलब्ध असणार आहेत. अशा या ग्रंथ, साहित्यिक व वाचक यांच्या आनंददायी व ज्ञानवर्धक मेळाव्यात जिल्हयातील सर्व ग्रंथप्रेमी व वाचकांनी सहभागी होऊन या ग्रंथोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रीनिवास मंगलपल्ली यांनी केले आहे.00000000

संबंधित पोस्ट

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

अनुसुचित  जातीच्या निवासी आश्रम शाळेच्या वतीने मेळावा व सामाजिक न्याय मंत्र्याचा सत्कार सोहळा; सर्वांनी उपस्थित राहण्याचे अ‍ॅड. चव्हाण यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

वेतन टप्पा अनुदानासाठी शासनाची सकारात्मक भूमिका- शिक्षण मंत्री दादाजी भुसे

vishwatmaklokswamivarta

मराठा आरक्षण कक्ष पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा – मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मराठा आरक्षण उपसमितीची बैठक

vishwatmaklokswamivarta

जलपुनर्भरणाचे धोरण तयार करावे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..