vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

आरक्षण हक्क कृती समितीची मंत्रालयावर निदर्शने

आरक्षण हक्क कृती समितीची मंत्रालयावर निदर्शने*

 

राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा मुंबई : प्रतिनिधी मागासवर्गीय पदोन्नती संदर्भात आरक्षण कृती समितीच्या वतीने मंत्रालय येथे तीव्र निदर्शने करण्यात आली आता राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे.

सरकारने दि. 7/5/2021 रोजी मागासवर्गीयांचे 33% आरक्षण रद्द केल्याने राज्यातील सर्व मागासवर्गीय संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या आरक्षण हक्क कृती समितीने 20 मे रोजी जिल्हाधिकारी, तहसीलदार कार्यालयावर आक्रोश आंदोलन केल्यावर मा. मुख्यमंत्री, मा. शरद पवार यांना दि. 24/5/2021 पासून भेटीची वेळ मागीतली होती अद्याप भेट न दिल्यामुळे आज दि. 4/6/2021 रोजी आरक्षण हक्क कृती समितीने मंत्रालयात प्रत्यक्ष चौकशी केली परंतु भेटीबाबत काहीच हालचाल झालेली नाही असे निदर्शनास आले आहे, शरद पवार यांनीही अद्याप भेटीची दिलेली नाही तसेच आमदार श्री. मंगेश कुडाळकर व आमदार श्री. प्रकाश फातर्पेकर यांनीही मा. मुख्यमंत्री उद्धव जी ठाकरे यांना बैठक घेण्याबाबत विनंती केली असूनसुद्धा काहीच कार्यवाही झालेली नसल्याचे दिसून आल्याने आपला आक्रोश व्यक्त करण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीने मंत्रालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर

आरक्षण हक्क कृती समितीच्या कोअर कमिटी व राज्य निमंत्रक सर्वश्री हरिभाऊ राठोड,(माजी खासदार ) सुनिल निरभवने,अरुण गाडे, एस. के. भंडारे, सिद्धार्थ कांबळे, आत्माराम पाखरे, शरद कांबळे, दीपक मोरे, सिद्धार्थ रणपीसे यांच्या नेतृत्वात मागासवर्गीय कर्मचारी संघटनांच्या प्रमुख पदाधिकारी यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र निदर्शने केली. हरिभाऊ राठोड, सुनिल निरभवने यांनी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना मागासवर्गीय पदोन्नतीतील आरक्षण मंत्री गट समितीच्या अध्यक्ष पदावरून व आशुतोष कुंभकोणी यांना अँडव्हॉकेट जनरल पदावरून तात्काळ हटविण्यात यावे आणि 7/5/2021 रोजीचा GR तात्काळ रद्द करून मागासवर्गीयांचे आरक्षण पूर्ववत सुरू करण्यासाठी मागासवर्गीय कर्मचारी/अधिकारी संघटना व समाज संघटना राज्यभर आंदोलन तीव्र करणार असल्याचा इशारा दिला.एस के भंडारेराज्य समन्वयक,आरक्षण हक्क कृती समिती यांनी दिला आहे.

संबंधित पोस्ट

पदवीधर/शिक्षक मतदारसंघाच्या मतदानाकरिता मतदारांना पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सरकारचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडवणीस व श्रीमती अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निर्मल रथाचा उद्घाटन करण्यात आले…

टाटा मुंबई आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धास्थळी उपस्थित राहून क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पर्धकांना दिल्या शुभेच्छा टाटा मुंबई मॅरेथॉन स्पर्धा अखंड ऊर्जेचा स्रोत – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta

भविष्य निर्वाह निधीचे वर्ष 2023-24 चे वार्षिक विवरण पत्र सेवार्थ प्रणालीत अपलोड

सहपालकमंत्री ना. संजय सावकारे आज जिजाऊ जन्मोत्सव सोहळ्याला उपस्थित राहणार

vishwatmaklokswamivarta

विधानसभा प्रश्नोत्तरे :पुणे शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस• गुन्हेगारीत सहभागी विधी संघर्षित बालकांसाठी दिशा कार्यक्रम…