vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

HSC: बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार…

 HSC: बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाणार…

प्रतिनिधी : कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द केल्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकरावी आणि बारावीच्या आतापर्यंतच्या महाविद्यालयांनी स्तरावरील कामगिरीच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.

मूल्यांकनाची कार्यपद्धती नंतर ठरवली जाणार आहे. तसेच गुणपत्रक आणि प्रमाणपत्र देण्याबाबत नंतर निर्णय जाहीर केला जाणार आहे. शिक्षण विभागाने याबाबत आज निर्णय जारी केला आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर आणि तिसऱ्या लाटेचा इशारा यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राथमिकता देण्यात आली होती. ‘सीबीएसईने निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्य मंडळांनीही बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पण मुल्यांकनाबाबत सरकारपुढे प्रश्न होता. पण याबाबतही आज निर्णय घेण्यात आला.

दहावीची बोर्ड परीक्षा याआधीच रद्द करण्यात आली आहे. त्यानंतर बारावीच्या परीक्षा ही रद्द झाल्याने पालकांना ही मोठा दिलासा मिळाला आहे.

संबंधित पोस्ट

गडचिरोलीला कोणी थांबवू शकत नाही !… अमर्याद संधीतून आपला विकास करून घ्या, महामॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

उमेदवार, पक्षांसाठी निवडणुकीबाबतच्या परवानग्या ऑनलाईन मिळण्यासाठी ‘सुविधा 2.0’ मोबाईल ॲप

vishwatmaklokswamivarta

सामान्य नागरिकांना लवकर न्यायमिळण्यासाठीआवश्यक तो विचार आणि उपाययोजना आवश्यक-सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या हस्ते-ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन संपन्न…

भारतीय हवाई दलाला आज मिळणार नवी ताकद, स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टरचा होणार समावेश..

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी