vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा सांगली जिल्हा दौरा

 

        सांगली, प्रतिनिधी: राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे शनिवार दि. 25 जानेवारी 2025 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्याचा सविस्तर कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

 शनिवार दि. 25 जानेवारी रोजी रात्री 9.30 वाजता मिरज येथे आगमन व श्री. शंकर आण्णा इसापुरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – ब्रम्हचैतन्य बंगला, मिरज कुपवाड रोड, पोवार पेट्रोल पंपासमोर, विस्पर वुड कॉलनी मिरज. सोयीनुसार शासकीय विश्रामगृह मिरजकडे प्रयाण, आगमन व मुक्काम.

   रविवार, दि. 26 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8.45 वाजता शासकीय विश्रामगृह मिरज येथून पोलीस परेड मैदान, विश्रामबाग, सांगलीकडे प्रयाण, सकाळी 9.10 वाजता आगमन व 76 व्या प्रजासत्ताक दिन समारंभास उपस्थिती, स्थळ – पोलीस परेड मैदान, ‍विश्रामबाग, सांगली. सकाळी 10.30 वाजता आगमन व आयुष सेवाभावी संस्था कार्यालय उद्घाटनास उपस्थिती, स्थळ – डॉ. जे. व्ही. शेट्टी यांच्या रूग्णालयाजवळ, कुपवाड. सकाळी 11 वाजता आगमन व सौ. स्मिता समीर पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – प्रमिला निवास, रेव्हेन्यु कॉलनी, चांदणी चौक शेजारी, दक्षिण शिवाजीनगर, सांगली, सकाळी 11.30 वाजता श्री. गणपती मंदीर, सांगली येथे आगमन व दर्शनासाठी राखीव, स्थळ – गणपती पेठ, सांगली, दुपारी 12 वाजता आगमन व उमेद आयोजित मिनी सरस (विक्री व प्रदर्शन), सन 2024-25 प्रदर्शनास सदिच्छा भेट, स्थळ – डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम, कॉग्रेस भवन जवळ, सांगली, दुपारी 12.30 आगमन व श्री. संजय भोकरे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ –सिद्धार्थ बंगला, हॉटेल पर्ल च्या शेजारी, विजयनगर, सांगली. दुपारी 1 वाजता आगमन व श्री. सुधीर चापोरकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – न्यु विजय कॉलनी, विश्रामबाग, सांगली. दुपारी 1.30 वाजता आगमन व श्री. समित कदम यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, स्थळ – कदम बंगला, शिवाजीनगर, मिरज. सोयीनुसार कोल्हापूरकडे प्रयाण.00000

संबंधित पोस्ट

पालखी सोहळा उत्कृष्ट व नियोजनबध्द पार पडण्यासाठीसर्व विभागांनी समन्वयाने काम करावे-जिल्हाधिकारी संतोष पाटील

विट्स हॉटेल निविदा प्रक्रियेची उच्चस्तरीय चौकशी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

हिंद-दी-चादर’ कार्यक्रमस्थळी नवी मुंबई व पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांकडून व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी…

वैद्यकीय अधिकाऱ्यांना नववर्षाची भेट वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवा अखंड क्षमापित पत्राचे वितरण..

१०० दिवस झाले, आता १५० दिवसांचा दुसरा कार्यक्रम – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चौंडीत घोषणा विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणांवर भर, तपशील आज देणार

एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्यानेअपारंपरीक इंधनावर परावर्तीत करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस