vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पावसाची उसंत मुंबईकरांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

पावसाची उसंत मुंबईकरांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा…

प्रतिनिधी,पहिल्याच पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडाली होती. दोन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबई, ठाण्यासह अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं. आज पावसानं थोडी उसंत घेतल्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. या मागचं कारण म्हणजे भारतीय हवामान विभागानं मुंबईमध्ये आज अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला होता.

 

हवामान विभगाने मुंबईत रेड अलर्ट बदलून ऑरेंज अलर्ट दिला. त्यामुळे आता नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज अतिमुसळधार नाही तर मुसळधार किंवा मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. कोकण विभागातील रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात मात्र रेड अलर्ट कायम असणार आहे.

 

दुसरीकडे पश्चिम, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. विदर्भातल्या काही जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

 

मुंबईमध्ये सध्या तरी पावसाच्या हलक्या सरी किंवा उघड झाप सुरू आहे. मुंबईत आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं दिली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

 

नवी मुंबईध्ये सकाळपासून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. अधूनमधून मध्यम तसंच हलक्या स्वरूपाचा पाऊस बरसतोय. रात्री पावसानं विश्राती घेतली होती. त्यानंतर पुन्हा सकाळी पाऊस पडण्यास सुरुवात झाली. हवामान खात्याने मुसळधार पावसाबाबत वर्तवलेला अंदाज रायगड जिल्ह्यात मात्र काहीसा चुकताना दिसतो आहे.

दक्षिण रायगडमधील महाड पोलादपूर या मोठ्या पावसाच्या विभागासह अलिबाग पेण मुरुड तालुक्यात पावसाने विश्रांती घेतल्याचेच चित्र आहे. मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय तर रायगड, पालघर, रत्नागिरीला आजही रेड अलर्ट आहे. सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघरमध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

संत संताजी जगनाडे महाराज यांना मंत्रालयात अभिवादन

vishwatmaklokswamivarta

आज भारताचा 78वा स्वातंत्र्यदिन निमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून लाल किल्ल्यावर ध्वजवंदन ध्वजारोहण, हेलिकॉप्टर द्वारा पुष्पवृष्टी.

गौण खनिजःअवैध उत्खनन व वाहतूक रोखणार स्थिर पथके;३९ ठिकाणी पथके तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारला मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; लाडक्या बहिणींनी केले औक्षण आणि अभिनंदन

vishwatmaklokswamivarta

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आयोजितराष्ट्रीय एकता दौडला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

vishwatmaklokswamivarta

मुंबईत 14 जानेवारीपासून सुरु होणार आयकॉनिक डबल डेकर इलेक्ट्रिक बसेस; जाणून घ्या कुठे बुक कराल तिकिटे

vishwatmaklokswamivarta