vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन;अंतिम तारीख ३१ जुलै २०२५

पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकने सादर करण्याचे आवाहन;अंतिम तारीख ३१ जुलै २०२५

नवी दिल्ली, प्रतिनिधी- दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला प्रतिष्ठित अशा पद्म पुरस्कारांची घोषणा होत असते. पद्म पुरस्कारांची नामांकने केंद्रीय गृह मंत्रालयाने सादर करण्याचे आवाहन केले असून याबाबत प्रक्रिया १५ मार्च २०२५ पासून प्रारंभ झाली आहे. नामांकने सादर करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२५ आहे. पद्म पुरस्कारांसाठीचे नामांकने (https://awards.gov.in). या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन सादर करण्यात यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

 देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण, आणि पद्मश्री यांचा समावेश असून हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक सेवा, नागरी सेवा, व्यापार आणि औद्योगिकी अशा विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कामगिरीसाठी प्रदान केले जातात. प्रत्येक भारतीय नागरिक या पुरस्कारांसाठी पात्र आहेत.

  नामांकन करण्यासाठी आणि योग्य व्यक्तींच्या शिफारसी सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषत: स्त्रिया, समाजातील दुर्बल घटक, अनुसूचित जाती-जमाती, दिव्यांग आणि नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या व्यक्तींच्या शोधासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  नामांकन सादर करताना, व्यक्तीच्या उल्लेखनीय कार्याची माहिती ८०० शब्दांपर्यंतच्या वर्णनात नमूद करणे आवश्यक आहे. यासंबंधी अधिक माहिती केंद्रीय गृह मंत्रालयाच्या https://mha.gov.in संकेतस्थळावर तसेच पद्म पुरस्काराच्या पोर्टलवर https://padmaawards.gov.in उपलब्ध आहे, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

००००

संबंधित पोस्ट

ज्येष्ठ शास्त्रीय गायक पंडित प्रभाकर कारेकर यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीसंगीत क्षेत्रातील महान तपस्वी हरपला..- उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

वाशीत २४ मार्च ते ४ एप्रिल या कालावधीत’महालक्ष्मी सरस २०२६’चे आयोजन महिला बचत गटांच्या कौशल्यपूर्ण दर्जेदार उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे आवाहन

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील मुलींची अभिमानास्पद कामगिरी क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून अभिनंदन

आज संसद भवन परिसरात लोकसभेतील विरोधी पक्षनेते . राहुल गांधी, काँग्रेस नेत्या . प्रियंका गांधी वाड्रा, समाजवादी पक्षाचे नेते  अखिलेश यादव यांच्यासह INDIA आघाडीच्या खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार निदर्शने..

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी कृषी विभागाने अधिक प्रयत्नशील राहावे – पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

शिवजयंती सोहळ्याचा आरंभ : बुलढाण्यात उसळला शिवसागर..सत्कर्मालाच देव मानणारे छत्रपती शिवराय सर्वश्रेष्ठ- निवृत्ती महाराज इंदुरीकर

vishwatmaklokswamivarta