vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2021, टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना; पहिल्याच दिवशी पावसाचं सावटं.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन 2021, टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड अंतिम सामना; पहिल्याच दिवशी पावसाचं सावटं

प्रतिनिधी : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याची प्रतीक्षा संपूर्ण जगाला आहे. दुपारी 3 वाजता साऊथेप्टम इथे हा सामना सुरू होणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर पहिल्याच दिवशी मात्र पावसाचं सावट असल्याचं दिसत आहे. इंग्लंडमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे हा पाऊस सामन्यात अडथळा आणू शकेल असा प्राथमिक अंदाज आहे.

 

खरं तर हवामान विभागाने 19 आणि 20 जून रोजी हवामान खराब असेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र पहिल्याच दिवशी पावसाचं आगमन झालं. त्यामुळे काहीशी चिंता देखील आहे. या पावसामुळे आजचा खेळ तर बिघडणार नाही ना अशी धाकधूक आहे. आज दुपारी 3 वाजता सामना सुरू होणार आहे त्यावर पावसाचं सावट मात्र कायम आहे.

भारतीय संघात जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी या तीन वेगवान गोलंदाजाना संधी देण्यात आली असून रवींद्र जाडेजा आणि रवीचंद्रन आश्विन या दोन्ही फिरकीपटूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविचंद्रन आश्विन, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी न्यूझीलंड विरुद्ध मैदानात उतरणार आहेत.

संबंधित पोस्ट

सचिन तेंडुलकरचा भारतीय फलंदाजांना मोलाचा सल्ला

vishwatmaklokswamivarta

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सन 2023-24 प्राथमिक छाननी गुणांकन प्रसिध्द करण्यासाठी सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन..

vishwatmaklokswamivarta

टोकियो ओलंपिक : भारतासाठी मोठी बातमी, कुस्तीपटू रवि कुमार दहिया फायनलमध्ये

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम

डर्बन येथे होणार्‍या मॅरेथॉन स्पर्धेसाठी भारतीय स्पर्धकांमध्ये जालन्याच्या जितेंद्र अग्रवाल यांचा समावेश

आयपीएलचे उर्वरित सामने ‘या’ तारखेपासून होणार सुरु, फायनल 15 ऑक्टोबरला!…

vishwatmaklokswamivarta