vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा ‘सिकंदर’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच मालामाल! 30 मार्च रोजी ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…

बॉलीवूड अभिनेता सलमान खान याचा ‘सिकंदर’ची अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्येच मालामाल! 30 मार्च रोजी ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला…

बॉलीवूड प्रतिनिधी

बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांचा दोन दिवसांनी ईदच्या निमित्तानं 30 मार्च रोजी ‘सिकंदर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची आगाऊ बूकिंग सुरु झाली आहे. तर मंगळवारी ‘सिकंदर’ ची प्री-सेल्स बुकिंग सुरु होणार आहे

आज गुरुवारी दुपारपर्यंत दोन दिवसात चित्रपटाचे 1 लाख पेक्षा जास्त तिकिटांची विक्री झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे., सलमानच्या चित्रपटासाठी असलेल्या या आगाऊ बूकिंगची संख्या ही थोडी कमी आहे. पण आशा आहे की अखेरच्या दोन दिवसात शुक्रवारी आणि शनिवारी बूकिंगची संख्या वाढू शकते. पण या सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सलमान खान या आधी त्याचा प्रदर्शित झालेला ‘टायगर 3’ च्या अगाऊ बूकिंगला मागे टाकणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे

बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा जो कोणताही चित्रपट हा ईदच्या निमित्तानं प्रदर्शित झाला त्या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. पण ‘सिकंदर’ च्या आगाऊ बूकिंगचा वेग पाहता सलमानची क्रेझ कमी झाल्याची चिंता त्यांच्या चाहत्यांमध्ये दिसून आली आहे.

Sacnilk नं दिलेल्या माहितीनुसार, ‘सिकंदर’ साठी आतापर्यंत 1 लाख 2 हजार 304 तिकिटांचं आगाऊ बूकिंग करण्यात आलं. IMAX च्या शो देखील सहभागी आहेत. गुरुवारी दुपारपर्यंत 11,167 शोचे प्री-सेल्स बूकिंग होतेय. तर 25 मार्चला आगाऊ बूकिंगच्या पहिल्या दिवशी जवळपास 4 हजार शोज आणि बुधवारी 27 मार्चच्या संध्याकाळी 8.5 हजार शोज साठी बूकिंग सुरु आहे.

गेल्या दोन दिवसात ओपनिंग डेसाठी आगाऊ बूकिंगसाठी ‘सिकंदर’ 2.91 कोटी ग्रॉस कलेक्शन केलं. जेव्हा रिझर्व तिकिटांची एकूण कमाई पाहिली तर एकूण 7.86 कोटी ही तब्बल प्री-सेल्स बूकिंग झाली आहे. यात सगळ्यात जास्त तिकिटांची विक्री ही दिल्ली-एनसीआर (1.31 कोटी), महाराष्ट्र (1.57 कोटी), राजस्‍थान (56.02 कोटी) आणि गुजरात (64.03 लाख) झाली आहे.. ‘सिकंदर’ विषयी बोलायचं झालं तर अजूनही त्यानं 20 कोटींचा आकडा देखील पार केलेला नाही. तर शेवटच्या दोन दिवसात तिकिटांच्या आगाऊ बूकिंगची संख्या वाढण्याची शक्यता आहे असल्याची बॉलीवूड सूत्रांची माहिती आहे

संबंधित पोस्ट

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

vishwatmaklokswamivarta

श्यामची आई’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

कानडा राजा पंढरीचा’मधून आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठलभक्तीचा सुरेल जागर सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २५ जुलै रोजी मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

झी स्टुडिओज् प्रस्तुत ‘आता थांबायचं नाय!’ चे दमदार टायटल पोस्टर लाँच!

vishwatmaklokswamivarta

कीर्तन: रुपेरी पडद्यावर इतिहास घडवणारा भव्य चित्रपट!दिग्दर्शक अतुल जगदाळे लवकरच घोषणा करण्याच्या तयारीत!

vishwatmaklokswamivarta

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेल्या लोकप्रिय गीतांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता यावा, यासाठी ‘शब्द सुरांची मैफल’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन