vishwatmaklokswamivarta
Breaking News
करमणुक

एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

*एशियन कल्चर’ पुरस्काराने दिग्दर्शिका सई परांजपे सन्मानित*आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते : दिग्दर्शिका सई परांजपे*

बॉलीवूड प्रतिनिधी –

२२ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवाचे आयोजन महाराष्ट्र शासन सांस्कृतिक विभाग,महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ आणि एनएफडीसी यांच्या सहकार्याने आयोजित २२ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला असून या महोत्सवाचे उद्‌घाटन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ.किरण कुलकर्णी(IAS), राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) चे व्यवस्थापकीय संचालक श्री प्रकाश मगदूम, सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांनी केले. यावेळी महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम, चैतन्य शांताराम, ज्युरी मेंबर सुप्रतिम भोल, सतीश जकातदार, प्रेमानंद मुजुमदार, कार्यकारिणी सदस्य श्रीकांत बोजेवार, फेस्टिव्हल डिरेक्टर संतोष पाठारे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी महोत्सवात सुप्रसिद्ध दिग्दर्शिका पद्मभुषण सई परांजपे यांना ‘आशियाई चित्रपट संस्कृती पुरस्कार’ देण्यात आला आणि दिग्दर्शिका उमा दा कुन्हा यांना ‘सत्यजित रे स्मृती पुरस्कार’ देऊन सन्मानित केले. महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

हॉलिवूड चित्रपट आपल्या सहज पाहता येतात. आपल्या शेजारी असलेले आशियाई देशातले चित्रपट आपण या महोत्सवादरम्यान पाहतो. आपली संस्कृती या महोत्सवांदरम्यान पहायला मिळते असं सांगत, महोत्सवातील अनेक उत्तम जागतिक चित्रपट पाहण्याचा आनंद प्रत्येकाने जरूर घ्यावा असे दिग्दर्शिका सई परांजपे यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक चांगल्या चित्रपटांचा आस्वाद घेता येणार आहे. सिनेप्रेमी आणि

00000

संबंधित पोस्ट

दिल्ली मराठी चित्रपट महोत्सवास शुक्रवारी प्रारंभ राजधानीत चित्रपट रसास्वाद मंडळाचा उपक्रम

१४ मार्च अभिनेता दादा कोंडके स्मृतिदिन जन्म – ८ ऑगस्ट १९३२ (मुंबई)स्मृती – १४ मार्च १९९८ (दादर,मुंबई)

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या राष्ट्रीय चित्रपट महामंडळानं मुंबईत ब्रिक्स वेव्हज बाजारचं केलं आयोजन.

मित्र सहयोग, ठाणे यांची ‘अनोळखी’ ठरली सर्वोत्कृष्ट उत्तरार्ध एकांकिका

संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला-सांस्कृतिक कार्य विभागाची सांगीतिक मानवंदना प्रख्यात संगीतकार दशरथ पुजारी यांच्या अजरामर गीतांची मैफल सावळ्या विठ्ठला हा सांगीतिक कार्यक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला आहे 

सेवा निवृत्त झालेले ACP अनिल गायकवाड यांनी सेवानिवृत्ती निमित्त स्वरवीर प्रस्तुत मीक्स बॉलीवुड कार्यक्रम संपन्न