vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

—————————————

जालना (प्रतिनीधी) माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या जलसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे आणि पै.हर्षवर्धन सदगिर यांनी शानदार डावपेच आखत आपल्या प्रतिस्पर्धी मल्लांना असमान दाखवत विजेतेपद पटकावले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या अन्य मल्लांनी देखील उत्कृष्ट कुस्तीचे प्रदर्शन करत कुस्तीप्रेमिंची मने जिंकली.

  येथील आझाद मैदानावर काल बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे होते. तर माजी आमदार कैलास गोरंटयाल,शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर, काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख,भाऊसाहेब काळे,राजेंद्र राख, युवा नेते अक्षय गोरंटयाल, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच, विनीत साहनी, भाजपा नेते राजेश राऊत, दीपक भुरेवाल, पै.बंकट यादव, पै.भरत मेकाले, बदर चाऊस, बाबुराव सतकर, नंदकिशोर जांगडे, लक्ष्मण सुपारकर, पै.विलास डोईफोडे, पै.अर्जुन आवारे, अब्दुल रउफ परसूवाले आदींची व्यासपीठावर उपस्थित होती.महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे, पंजाब केसरी शेंडीकुमार, हर्षवर्धन सदगिर, पृथ्वीराज पाटील या नामवंत मल्लांसह राज्यातील विविध कुस्त्यांचे फड गाजविणारे अनेक मल्ल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने जालना शहर व जिल्ह्यातील कुस्ती प्रेमींनी आझाद मैदानावर दुपारपासूनच गर्दी केल्याचे दिसून आले. राज्यातील विविध जिल्ह्यातील जवळपास १ हजार लहान मोठ्या मल्लांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवत कुस्ती स्पर्धेत आपल्या खेळाची चुणूक दाखवून कुस्तीप्रेमींची मने जिंकली. स्पर्धेचे मुख्य आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पंजाब केसरी शेंडीकुमार यांच्यात पहिल्या गटातील विजेतेपदासाठी रात्री उशिरा लढत झाली. या लढतीत शिवराज राक्षे याने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत प्रतिस्पर्धी शेंडीकुमारवर वर्चस्व राखून विजेतेपदाला गवसणी घातली. तर दुसऱ्या गटातील विजेतेपदासाठी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यात अत्यंत चुरशीची लढत झाली. मात्र, या लढतीत सदगीर याने आपल्या प्रतिस्पर्धी मल्लावर आक्रमक चढाया करत शेवटच्या क्षणापर्यंत आपले वर्चस्व गाजवून पाटीलला पराभवाची धूळ चारत विजेतेपदावर आपले नाव कोरले. विजेत्या व उपविजेत्या मल्लांना उपस्थीत मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी विजय चौधरी, महावीर ढक्का, धनराज काबलिये, रमेश गौरक्षक, जीवन सले, वाजेद पठाण, जगदीश भरतीया, मोहन इंगळे, अशोक भगत, संजय भगत, सोनू सामलेटी, सय्यद अझहर, आरेफ खान, श्रावण भुरेवाल, विनोद रत्नपारखे, रवी जगदाळे, राजेंद्र जाधव, अतिक खान, आमेर पाशा, अरविंद देशमुख, अशोक पडुळ, शेख शकील, नजीब लोहार, कपिल भुरेवाल, संतोष माधवले, रंजीत मगरे, विजय पवार, संदीप नाईकवाडे, नंदू मेघावाले, अन्वर पहेलवान, कवल पहेलवान, गोविंद झुंगे, अमोल धानुरे, संजय मिसाळ, योगेश पाटील, अमोल सरवडीकर, छोटू चित्राल,अरुण घडलिंग, राहुल यादव, बजरंग राजपूत, जॉन्सन पहेलवान, गजानन लाड, अमोल भावसार, घनशाम खाकिवाले, संजय पाखरे, दुर्गेश काठोठीवाले, दत्ता पाटील घुले, बापू साळवे, शेख मुश्ताक, युसुफ परसुवाले, कृष्णा पडूळ, सोपान तिरुखे, दीपक कावळे, अरुण सरदार आदींनी परिश्रम घेतले. यावेळी पोलिस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.

————चौकट——मा.आमदार कैलास गोरंटयाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव—————————————-

 माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील श्री गुरु गणेश भवन मधील सभागृहात सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत आपल्या वाढदिवसा निमित्त शुभेच्छा स्वीकारल्या. शहर व जिल्ह्यातील विविध पक्षांचे प्रमुख नेते, पदाधिकारी, महीला पदाधिकारी, कार्यकर्ते, जिल्हा परिषद, पंचायत समिती,नगर परिषदेचे माजी पदाधिकारी, सदस्य तसेच व्यापारी, उद्योजक,राजकीय, सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक, शिक्षण आदी क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, सर्वसामान्य नागरिकांनी यावेळी उपस्थीत राहून गोरंटयाल यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ, पुष्पहार देऊन मिठाई भरवत वाढदिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या.

संबंधित पोस्ट

सी-व्हिजिल ॲपवरील तक्रारींचे जलदगतीने निराकरण-923 तक्रारींपैकी 870 तक्रारींचे शंभर मिनिटांच्या आत निराकरण

vishwatmaklokswamivarta

इतर मागास बहूजन कल्याण-:शिंपी, गवळी, लाडशाखीय वाणी-वाणी, लोहार, नाथपंथीय समाजासाठी महामंडळे

vishwatmaklokswamivarta

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गतप्रसिध्द होणाऱ्या मतदारयादीत मतदारांनी नाव असल्याची खात्री करावी- जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांची घेतली भेट* 

देशातील युवा परदेशात जातोय… हे थांबलं पाहिजे – सपा राज्य उपाध्यक्ष जोशी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने समाजवादी पक्षाची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 नाचणी धान्यावरील प्रक्रिया पद्धती व मूल्यवर्धन:

vishwatmaklokswamivarta