vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी नवी मुंबईत मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन

लोकसेवांविषयी जनजागृतीसाठी नवी मुंबईत मनोरंजनातून प्रबोधनात्मक पथनाट्यांचे आयोजन

 

        नवी मुंबई प्रतिनिधी-  ‘महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015’ विषयी सविस्तर माहिती मिळावी तसेच लोकसेवा नागरिकांना सुलभ व सहज रितीने उपलब्ध व्हाव्यात या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका राबवित असलेल्या कार्यप्रणालीबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने सेवा हक्क दिनाचे औचित्य साधून 28 एप्रिल रोजी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते.

   नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आवश्यक असणा-या लोकसेवा सुलभ रितीने उपलब्ध व्हाव्यात याकरिता ऑनलाईन प्रणालीचा प्रभावी वापर केला जात आहे. या अनुषंगाने महापालिकेच्या www.nmmc.gov.in या संकेतस्थळाप्रमाणेच माझी नवी मुंबई – My NMMC या ॲपवरही या लोकसेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. यामध्ये जन्म, मृत्यू, विवाह नोंदणी अशा विविध 68 लोकसेवा ऑनलाईन पुरविण्यात येत आहेत.

      या लोकसेवांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता यावी यादृष्टीने मनोरंजनातून प्रबोधन करणार-या पथनाट्यासारख्या लोकप्रिय व प्रभावी माध्यमाचा समर्पक वापर महापालिकेच्या वतीने करण्यात आला.

        क्रीडा व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने लोकसेवांबाबत माहितीप्रद विशेष पथनाट्याचे सादरीकरण महापालिका क्षेत्रात मुख्यालयाप्रमाणेच मॉल, स्टेशन परिसरात करण्यात आले. आरंभ इव्हेन्ट्सतच्या अक्षय खांबे, शौनका पोळ, धीरज सोडिये, आशिष कदम, प्रतीक घाडगे, शुभम भोबस्कर या कलावंतांनी सादर केलेल्या पथनाट्याला सर्व ठिकाणी नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

000000

संबंधित पोस्ट

ह्युमन राइट्स संरक्षण संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी गजानन वाळके

संगीत आणि तंत्रज्ञानाचा संगम घडवणारा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम – मंत्री ॲड्. आशिष शेलार

जालना येथील श्री विश्वराज आयुर्वेदिक सुपर स्पेशालिटी चिकित्सालय व पंचकर्म सेंटर १५ व्या वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन संपन्न

vishwatmaklokswamivarta

राजर्षी शाहूंना कृतज्ञ अभिवादन : ट्रस्टतर्फे दसरा चौकात पुष्पांजली

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

टीटीएफ २०२५ मध्ये महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाचा सहभागमहाराष्ट्राचे दालन ठरले ‘सर्वोत्कृष्ट’