vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

जिल्ह्यात १५ दिवसांसाठी जमावबंदी लागू

गडचिरोली, प्रतिनिधी : येत्या १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन साजरा होणार आहे. यानिमित्त विविध राजकीय पक्ष, संघटना आणि नागरिकांकडून धरणे, मोर्चे, आंदोलने, सभा किंवा सार्वजनिक कार्यक्रम आयोजित होण्याची शक्यता लक्षात घेता, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात दिनांक २६ एप्रिल २०२५ रोजी मध्यरात्रीपासून ते १० मे २०२५ रोजी रात्री १२ वा.पर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.

या कालावधीत शस्त्रास्त्र, दाहक व स्फोटक पदार्थ, दगड, क्षेपणास्त्रांची उपकरणे यांचा वापर किंवा वाहतूक, तसेच सभ्यता व नितीमत्तेला धक्का पोहचवणारी भाषणे, गाणी, चित्रफलक किंवा जनतेत अस्थिरता निर्माण करणारी कोणतीही कृती करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

याशिवाय उपविभागीय दंडाधिकारी किंवा संबंधित पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय कोणतीही मिरवणूक काढणे, तसेच पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणे पूर्णतः मनाई करण्यात आले आहे.

हा आदेश संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात लागू असून, उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

संबंधित पोस्ट

श्रीवर्धन येथील मौजे बागमांडला समुद्र किनाऱ्यांवर पहिल्यांदाच आढळले नर जातीचे ग्रीनसीटर्टल कासव

vishwatmaklokswamivarta

अनुसूचित व नवबौद्ध मुला-मुलींच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरू

पावसाळ्यात साकव दुरुस्तीअभावी गावाचा संपर्क तुटता कामा नये- ग्रामविकास व पंचायतराज राज्यमंत्री योगेश कदम

कोल्हापूर जिल्ह्यातील २९ हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार होणार; शासकीय जमिनीवरील २०११ पूर्वीची निवासी अतिक्रमणे नियमानुकूल होणार-शासन निर्णयाचा जिल्हयातील सर्व पात्र लाभार्थ्यांना फायदा होण्यासाठी मिशन मोडवर काम करावे- पालकमंत्री प्रकाश आबिटकर

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्मृतीपत्रे उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्रासह चार राज्यांना रेल्वे प्रकल्पांची भेट; १८,५०९ कोटींच्या खर्चाला मंजुरी