vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय…

         राज्य प्रतिनिधी   वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करणे, त्यासाठीची आवश्यक पदे उपलब्ध करून देणे आणि येणाऱ्या खर्चास आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

  वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथे दिवाणी न्यायालय (वरिष्ठ स्तर) स्थापन करण्यासाठीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाकडून शासनास सादर करण्यात आला होता. या प्रस्तावास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या न्यायालयाकरिता २३ नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे पाच पदांच्या सेवा उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. यापोटी येणाऱ्या एकूण रूपये 1,76,42,816/- इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. या न्यायालयासाठी दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर)-एक, अधीक्षक-एक, सहायक अधीक्षक-दोन, लघुलेखक श्रेणी-२-एक, वरिष्ठ लिपिक-तीन, कनिष्ठ लिपिक-नऊ, बेलीफ-तीन, शिपाई-तीन, पहारेकरी-एक, सफाईगार-एक अशा पदांना मान्यता देण्यात आली.

00000

संबंधित पोस्ट

गाजीपुर अपघातग्रस्त रुग्णाची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यात 117 उपाययोजनांचा समावेश

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांचे जीवन सुकर करण्यास सर्वोच्च प्राधान्य-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यातील सर्व उद्योजकांनी-फ्लॅटेड गाळा भाडे सवलत योजनेचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीने देशाची महासत्तेकडे वाटचाल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमली पदार्थ संबंधी गुन्ह्यांत झिरो टॉलरन्स महत्वाचे

vishwatmaklokswamivarta

अहमदपूर तालुक्यातील चिलखा येथे अडकलेल्या चार मजुरांची सुखरूप सुटका

vishwatmaklokswamivarta