vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

महाराष्ट्राच्या सुपुत्राने अबुधाबीमध्ये केली पाकिस्तानच्या दहशतवादाची पोलखोल

महाराष्ट्राच्या सुपुत्राने अबुधाबीमध्ये केली पाकिस्तानच्या दहशतवादाची पोलखोल

विदेश प्रतिनिधी

भारताने दहशतवादाचा सामना करण्यासाठी धोरणात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळाने अबूधाबीला ( युएई ) भेट दिली आणि तिथे सहिष्णुता मंत्रालयाचे मंत्री महामहिम शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान तसेच युएईतील अनेक प्रमुख नेत्यांसोबत चर्चा केली. या बैठकीस युएईमधील भारताचे राजदूत श्री. संजय सुधीर हे देखील उपस्थित होते.

या चर्चांना अत्यंत महत्त्व होते आणि त्या मुख्यतः धोरणात्मक विषयांवर केंद्रित होत्या. बैठकीदरम्यान, युएईच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील दहशतवादाच्या विरोधात ठाम भूमिका घेतली. युएईने घेतलेल्या या भूमिकेचे शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी स्वागत केले. या सदस्यांमध्ये श्री. मनन कुमार मिश्रा, डॉ. सस्मित पात्रा, श्री. ई. टी. मोहम्मद बशीर, श्री. एस. एस. आहलुवालिया, श्री.अतुल गर्ग, बन्सुरी स्वराज आणि राजदूत श्री.सुजन आर. चिनॉय यांचा समावेश होता.

संबंधित पोस्ट

भारतीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची स्टॉकहोममध्ये आंतरराष्ट्रीय निवडणूक अधिकाऱ्यांसोबत द्विपक्षीय बैठक

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर  व्यावसायिक संबंध अधिक दृढ- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल-महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

सीरियाची राजधानी दमास्कसमध्ये झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात एलियास चर्चमध्ये १५ जणांचा मृत्यू झाला तर १३ जण गंभीर जखमी…

रोटरी इंटरनॅशनलचे दक्षिण कोरियाचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुप्रसिद्ध नेते संगकू युन यांचा मुंबई दौरा संपन्न, भारत देशात समाजसेवेसाठी अनेक संधी…

म्यानमार आणि थायलंडमध्ये ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात २५ जणांचा मृत्यू, ४३ जण बेपत्ता…